देशात २४ तासांत ८,९०९ नवे रुग्ण; २१७ जणांचा मृत्यू

देशात २४ तासांत ८,९०९ नवे रुग्ण; २१७ जणांचा मृत्यू

देशात कोरोनबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून देशात गेल्या २४ तासांत ८ हजार ९०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत २१७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ७ हजार ६१५ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ८१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ३०३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ४ हजार ७७६ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ४८.३१ टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण १ लाख १ हजार ४९७ आहेत.

राज्यात ७२ हजार ३०० कोरोनाबाधित

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे. सध्या कोरोनाबाधितांचा आकडा ७२ हजार ३०० झाला आहे. त्यातील ३१ हजरा ३३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात आतापर्यंत २ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप ७ राज्य

First Published on: June 3, 2020 2:19 PM
Exit mobile version