Coronavirus Outbreak: भारतात कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजची तयारी

Coronavirus Outbreak: भारतात कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजची तयारी

कोरोना व्हायरस

सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या ८७२ वर पोहचली असून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत याचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला असला तरी कोरोनाच्या रुग्नांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या देशभरात दिवसाला ११०० कोरोनाच्या चाचण्या केल्या जात असल्यामुळे नक्की किती संसर्ग झालेले रुग्ण आहेत. याचा आकडा अजून निश्चित झालेला नाही, मात्र टेस्टिंग किट वाढवण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना केली आहे. त्यावेळी मात्र भारतात कोरोना तिसऱ्या स्टेजला गेल्याचे समोर येऊ शकते, अशा वेळी त्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे? याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे.

अशी सुरु आहे तयारी

१. देशभरातील १७ राज्यांना आदेश देण्यात आले आहेत कि, त्यांनी केवळ कोरोना रुग्नांसाठी रुग्णालये खाली करावीत, जेणेकरून कोरोनाग्रस्त रुग्नाची संख्या वाढल्यास गैरसोय होणार नाही.

२. सैन्य दल २८ रुग्णालये कोरोनाग्रस्तांसाठी तयार करत आहेत, ज्यातील ५ रुग्णालयांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा असणार आहे.

३. शास्त्रस्त निर्मिती करणाऱ्या भेल कंपनीला तातडीने व्हेंटीलेटर्स बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच डिफेन्स रिसर्च लॅबोरेटरीने सॅनिटायझर आणि मास्क मोठया संख्येने बनवण्यास सुरवात केली आहे.

४. कोरोना संसर्ग झालेल्यांसाठी विलगीकरण कक्ष उभारणे आणि त्यांच्या साठी वैद्यकीय सेवा पुरवणे यासाठी सरकारने सैन्य दलातील पोलीस बलाला आपत्काळात आर्थिक अधिकार प्रदान केले आहेत.

५. रेल्वे मंत्रालय रेल्वेच्या डब्यांना विलगीकरण कक्षात रूपांतरित करत आहे. रेल्वेच्या सर्व विभागांना दार आठवड्यात किमान १० डब्यांची १ रेल्वे कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करण्यासाठी विलगीकरण कक्षासह सर्व वैद्यकीय सेवांनी सज्ज करण्याचे आदेश देण्यात आहे आहेत, त्या कामाला सुरुवातही झाली आहे.

६. देशातली सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी बेड रिकामे करून ठेवण्याचे तसेच आता अन्य आजारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची स्थिती पाहून त्यांना घरी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

७. कोविड -१९ संसर्गावार एम्स ला विषेश पथक निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांनी या संबंधी नियमावली बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

८. केंद्राने रुग्णालयांना सर्व तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.

९. देशात व्हेंटीलेटरचा तुटवडा असल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी १० हजार व्हेंटिलेटरची ऑर्डर दिली आहे.

First Published on: March 28, 2020 7:42 PM
Exit mobile version