Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1150 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1150 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1150 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्याने वाढत आहे. तर भारतातही नव्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात दगेशात कोरोनाचे 1150 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 11558 इतकी झाली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 558 वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 751 झाली आहे. तर 4 कोटी 25 लाख 8 हजार 788 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 31 हजार 958 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोनाविरोधी लसीचे 186 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल 12 लाख 56 हजार 533 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 186 कोटी 51 लाख 53 हजार 593 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2,49,97,605) प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्याचवेळी, कोरोना योद्ध्यांसाठी लसीकरण मोहीम २ फेब्रुवारीपासून सुरू झाली.


चंद्रकांत पाटलांसाठी राष्ट्रवादीने काढलं हरिद्वारचे थ्री टायर एसीचे तिकीट


First Published on: April 17, 2022 11:36 AM
Exit mobile version