LIVE UPDATES: राज ठाकरेंच्या नावाने बनावट अकाऊंट

LIVE UPDATES: राज ठाकरेंच्या नावाने बनावट अकाऊंट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच अमित ठाकरे,शर्मिला ठाकरे आणि उर्वशी ठाकरे यांच्या नावाने फेसबुक, ट्विटर, इन्स्‍टाग्राम आदी सोशलमिडियावर बनावट अकाऊंट  बनवून मेसेज पसरविण्यात येत आहेत.अशा बनावट अकाऊंट  युझर्सविरोधात मनसेने मुंबईच्या पोलीस आयुक्‍त कार्यालयात तसेच सायबर सेलकडे गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.


सत्ताधारी आणि विरोधकांचा चहा पानाचा कार्यक्रम रद्द. अधिवेशनाच्या आधी सरकारकडून चहा पानाचे आययोजन केले जाते. या चहापानला विरोधी पक्षाला देखील बोलवले जाते. पण हे चहापान यावर्षी रद्द झाले. राष्ट्रपती निधनामुळे दुखवटा आहे, त्यामुळेही चहापान रद्द.


सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना काल अटक केला होती. आज कोर्टासमोरा त्यांना हजार करण्यात आले. त्यांना न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे.


रियाचं ड्रग्ज संदर्भातील चॅट हाती लागल्यानं एनसीबीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. नार्कोटिक्सकडून रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर येत आहे.


सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात आणण्यात आले आहे. गेल्या दीड तासांपासून एनसीबीचे अधिकारी, शौविक आणि सॅम्युअल सायन रुग्णालयात आहेत. आज कोर्टात हजर करण्यापूर्वी दोघांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.


निवृत्त सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची मुख्यमंत्री सल्लागार पदी नियुक्ती झाल्या माहिती समोर आली आहे. पुण्यातील मुख्यालयात डॉ. दीपक म्हैसेकर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. यापूर्वी पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.


देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या ४० लाख पार झाली असून ४० लाख २३ हजार १७९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६९ हजार ५६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३१ लाख ७ हजार २२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सध्या ८ लाख ४६ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण त्यांना कोरोनाची सौम्य आढळले आहेत. उद्या पुन्हा एकदा स्वॅब तपासणीसाठी देणार आहे. राजू शेट्टी यांच्या स्वीय सहाय्यकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या देखील कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान संपर्कात असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राजू शेट्टींनी केले आहे.

First Published on: September 5, 2020 8:55 PM
Exit mobile version