Coronavirus:थ्रि इडियट स्टाईलमध्ये बाईकवर बसवून कोरोनारुग्णाला नेलं रुग्णालयात

Coronavirus:थ्रि इडियट स्टाईलमध्ये बाईकवर बसवून कोरोनारुग्णाला नेलं रुग्णालयात

Coronavirus:थ्रि इडियट स्टाईलमध्ये बाईकवर बसवून कोरोनारुग्णाला नेलं रुग्णालयात

जगभरामध्ये कोरोना व्हायरसची स्थिती दिवसेंदिवस बिघडतच आहे. संपूर्ण देश या भयंकर महामारीशी लढत आहे.आपुर्‍या सोयी सुविधे अभावी अनेक कोरोनारूग्ण दगावत आहे. अशातच अनेक नागरिक मदतीसाठी पुढाकार घेत आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनाच्या लढ्यात सहभागी होत आहेत. केरळ मध्ये मानवतेच दर्शन घडवणारी घटना घडली आहे. केरळ मधील कोव्हिड केयर सेंटरमधील वॉलेंटियर्सने कोरोनारुग्णाची स्थिती बिघडतांना पाहून त्याला बाईकवर बसवून थ्रि इडियट स्टाइलमध्ये रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाण्यात आलं आहे. वॉलेंटियर्सच्या या धाडसी कामगिरी बद्दल मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वॉलेंटियर्सचे कौतुक केलं आहे.
संबंधित घटना केरळ मधील अलप्पुझा जिल्ह्यातील असून पुन्नापारा गावात घडली आहे. अश्विन कुंजुमोन आणि रेखा पुन्नापारा डोमेसाइल हे दोघेही केयर सेंटर मध्ये वॉलेंटियर म्हणून काम करत होते. शुक्रवारी जेव्हा आश्विन आणि रेखा कोरोना रुग्णांना जेवण देण्यासाठी गेले असता दोघांच्याही निदर्शनास आले की एका कोरोना रुग्णाची स्थिती गंभीररित्या बिघडत आहे. त्याला श्वास घेण्यास देखील त्रास होत आह. हे पाहून त्यांनी सर्वात आधी अॅम्ब्युलन्सला फोन लावला. पण अॅम्ब्युलन्सला पोहोचण्यात 10 ते 15 मिंनट उशीर लागणार होता. यामुळे दोघांनी त्वरित निर्णय घेऊन रूग्णाला बाईक वर बसवून 100 मीटरच्या अंतरावर असणार्‍या रुग्णालयात दाखल केले. दोघांच्याही या धाडसी कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

केरळ मध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता मुख्यमंत्री पिनराई विजयन सरकार तर्फे 16 मे पर्यंत कडक लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे.


हे हि वाचा – गोमूत्र प्यायल्याने कोरोना जातो; भाजप आमदाराचा अजब सल्ला, VIDEO व्हायरल

First Published on: May 8, 2021 1:19 PM
Exit mobile version