चीनमधून आली मांजर, म्हणून उडाली खळबळ

चीनमधून आली मांजर, म्हणून उडाली खळबळ

चीनमधून आली मांजर, म्हणून उडाली खळबळ (फोटो प्रातिनिधिक आहे)

करोना व्हायरस सध्या अनेक देशात मोठ्या प्रमाणात थैमान घालत असतानाच आता भारतात देखील २८ करोनाचे संशयित आढळ्याचे वृत्त समोर आले आहे. त्यातच आता चीनमधून आलेल्या मांजरीने एक नवे संकट भारतासमोर उभे राहिले आहे. २० दिवसांपूर्वी एक मांजर चीनहून चेन्नईला दाखल झाली आहे. ही मांजर एका कंटेनमधून आली असल्याचे समोर आले आहे. तसेच या मांजरीला तिच्या मायदेशी पाठवण्याची तयारी केली जात आहे. मात्र, यावर प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेने त्याला विरोध करीत मांजरीला मायदेशी पाठवू नका कारण ‘या कंटेनरचा चीन ते भारत असा १० ते २० दिवसांचा प्रवास झाला आहे. त्यामुळे बरेच दिवस अन्न पाणी न मिळाल्याने त्या मांजरीचे जगणे कठीण होऊ शकते’. त्यामुळे तिला पाठवू नका, अशी मागणी केली आहे.

मांजरीसाठी लिहिले पत्र

सध्या या मांजरीला चेन्नईच्या बंदरावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पेटा इंडिया या संस्थेच्या रश्मी गोखले यांनी चेन्नई बंदर प्राधिकरण यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी लिहिले आहे ‘वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, असे सिद्ध झाले आहे की मांजरीना करोना विषाणूची लागण होऊ शकत नाही. तसेच त्यांच्यापासून कोणताही प्रादूर्भाव देखील होणार नाही’, त्यामुळे त्या मांजरीची रवानगी करु नये.

अमेरिकेच्या पशु वैद्यकीय असोशिएशनने सांगितल्याप्रमाणे ‘कोणत्याही पाळीव प्राण्यांना करोनाची लागण होत नाही. तसेच त्यांच्यामुळे कोणताही करोना व्हा-यरस पसरु देखील शकत नाही. त्यामुळे या मांजरीला चीनमध्ये पाठवणे योग्य नाही.


हेही वाचा – करोनाची लक्षणे ओळखून आधीच घ्या योग्य ती खबरदारी!


 

First Published on: March 4, 2020 4:18 PM
Exit mobile version