देशात कोरोनाचा कहर; एका दिवसात ४१० जणांचा बळी, १९ हजारांहून अधिकांना संसर्ग

देशात कोरोनाचा कहर; एका दिवसात ४१० जणांचा बळी, १९ हजारांहून अधिकांना संसर्ग

प्रातिनिधिक छायाचित्र

देशात कोरोना विषाणूची वाढ झपाट्याने होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या कोरोना विषाणूच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ५ लाख २८ हजार ८५९ लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. तर आतापर्यंत, ३ लाख ९ हजार ७१३ लोक उपचार करून बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाने १६ हजार ९५ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितेल जात आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण २ लाख ३ हजार ५१ कोरोना अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर गेल्या २४ तासांत एकूण ४१० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून कोरोना व्हायरची लागण झालेल्या १९ हजार ९०६ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

जर आपण राज्यांच्या आकडेवारीबद्दल सांगायचे झाले तर अंदमान आणि निकोबारमध्ये ७२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहेत. महाराष्ट्रात १ लाख ५९ हजार १३३ जणांना कोरोनाची लागण झाली तर तब्बल ७ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला.

तसेच आंध्र प्रदेशात १२,२८५ जणांना कोरोनाची लागण तर १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. अरुणाचल प्रदेशात १७७ जणांना संसर्ग तर एकाचा मृत्यू, आसाममध्ये ६ हजार ८१६ जणांना लागण तर ९ जणांचा मृत्यू, बिहारमध्ये ८ हजार ९३१ जणांना कोरोनाची लागण तर ५९ जणांचा मृत्यू, चंडीगडमध्ये ४२८ जणांना कोरोनाची लागण तर ६ जणांचा मृत्यू, गोव्यात १ हजार १२८ जणांना कोरोनाची लागण २ जणांचा मृत्यू, गुजरातमध्ये ३० हजार ७०९ लोकांना लागण तर १ हजार ७८९ जणांचा मृत्यू झाला आहे.


भारतातही करोनावर प्रभावी ठरतंय ‘डेक्सामेथासोन’
First Published on: June 28, 2020 10:25 AM
Exit mobile version