Corona Update : चिंता मिटली! देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

Corona Update : चिंता मिटली! देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

India Corona Update:देशात ८० दिवसानंतर आज ६० हजाराहून कमी रुग्णांची नोंद, तर १५७६ मृत्यू

देशात कोरोनाची दुसरी लाट कुठे तरी ओसरताना दिसतेयं. कारण गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कमी येतयं आहेत. तर नव्या कोरोना रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच कोरोनामुळे मृत पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही काही अंशी घटले आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख ७३ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर २ लाख ८४ हजार ६०१ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज देशात ३ हजार ६१७ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत १ लाख ७३ हजार ७९० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर कोरोनामुळे ३ हजार ६६० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. देशात आज २ लाख ८४ हजार ६०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९०.८० टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर ९. ८४ टक्के झाला असून दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रमाण ३.३६ टक्के झाले. सलग पाच दिवसांपासून हे प्रमाण १० टक्के झाले आहे.

देशात आत्तापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ झाली आहे. तर २ कोटी ५१ लाख ७८ हजार ०११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख २२ हजार ५१२ रुग्णांनी कोरोनाचे बळी ठरले आहेत. देशात सध्या २२ लाख २८ हजार ७२४ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासह आतापर्यंत देशातील २० कोटी ८९ लाख ०२ हजार ४४५ नागरिकांना कोरोनाविरोधी लस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, २८ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३४ कोटी ११ लाख १९ हजार ९०९ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील २० लाख ९० हजार ०४८ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.


Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ, मुंबईत पेट्रोल शंभरी पार


 

First Published on: May 29, 2021 11:14 AM
Exit mobile version