Coronavirus India Update: देशात कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांपेक्षा कमी, तर मृतांचा आकडा १ हजारांपेक्षा कमी

Coronavirus India Update: देशात कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजारांपेक्षा कमी, तर मृतांचा आकडा १ हजारांपेक्षा कमी

Coronavirus पुढील ६ महिन्यात कोरोना विषाणूचा प्रभाव होणार कमी, आरोग्य तज्ज्ञांचे मत

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वाढत आहे. मात्र आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर मृतांचा आकडाही १ हजारांपेक्षा कमी झाला आहे. त्याचबरोबर नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहेत. गेल्या २४ तासांत ४६ हजार १४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५८ हजार ५७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी २ लाख ७९ हजार ३३१ वर पोहचली आहे. यातील ३ लाख ९६ हजार ७३० रुग्णांचा मृत्यू झाला असून बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९३ लाख ०९ हजार ६०७ पोहचली आहे.

देशात सध्या ५ लाख ७२ हजार ९९४ अँटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालय तर काहींवर घरीच उपचार सुरु आहेत. २७ जूनपर्यंत देशात ४० कोटी ९६ लाख ७१ हजार २७९ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १५ लाख ७० हजार ५१५ चाचण्या काल, रविवारी दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

First Published on: June 28, 2021 10:10 AM
Exit mobile version