कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ७ हजारांहून अधिक नवे रूग्ण, १७५ लोकांचा मृत्यू

कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ७ हजारांहून अधिक नवे रूग्ण, १७५ लोकांचा मृत्यू

देशात समूह संसर्गास सुरुवात IMAचा इशारा

देशात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच असून दिवसेंदिवस नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे ७ हजार ४६६ नवीन रुग्ण आढळले आहेत तर १७५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत देशात कोरोना रूग्णांची संख्या १ लाख ६५ हजार ७९९ झाली आहे.

साधारण ९० हजारांच्या जवळपास अॅक्टिव्ह केसेस

कोरोनामुळे आतापर्यंत ४ हजार ७०६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या २४ तासांत, साधारण ४ हजार ७०६ लोकं बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या लोकांची संख्या ७१ हजार १०५ असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच देशात साधारण ९० हजारांच्या जवळपास कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या ६० हजारांवर!

महाराष्ट्रात एकूण कोरोना रूग्णांची संख्या ६० हजारांवर पोहोचण्याच्या मार्गावर आहे. सध्या ५९ हजार ५४६ रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे, यापैकी १ हजार ९८२ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू दुसर्‍या क्रमांकावर असून तेथे १९ हजार ३७२ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यापैकी १४५ लोकांचा कोरोनाने बळी घेतल्याचे समोर आले आहे.

गुजरातला मागे टाकत दिल्ली ३र्‍या क्रमांकावर

रूग्णाच्या आकडेवारीत गुजरातला मागे टाकत दिल्ली तिसर्‍या क्रमांकावर आली आहे. गेल्या २४ तासांत १ हजार २४ नव्या रूग्णांची नोंद तेथे करण्यात आली असून आतापर्यंत एकूण १६ हजार २८१ प्रकरणं नोंदली गेली आहेत, ज्यामध्ये ३१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर गुजरातमधील एकूण रुग्णांची संख्या १५ हजार ५६२ असून त्यापैकी ९६० लोकांचा मृत्यू झाला आहे.


कोरोनाच्या जन्मदात्या चीनलाही भारताने मागे टाकले, सर्वाधिक रुग्णसंख्येत ९ वा क्रमांक

First Published on: May 29, 2020 10:46 AM
Exit mobile version