Coronavirus India Update: देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्येत तब्बल ७ हजारांची वाढ, तर रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर

Coronavirus India Update: देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्येत तब्बल ७ हजारांची वाढ, तर रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेचे काळे ढगं घोंघावत आहेत. यात डेल्टा प्लस विषाणूने देशासमोरील चिंता अधिक वाढवली आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगण आणि पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येतही आज मोठी वाढ पाहायला मिळाली. देशात मंगळवार नोंद झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज जवळपास ७ हजार रुग्णांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी देशात ३७ हजार ५६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर आज देशात ४५ हजार ९५१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. मात्र मृतांचा आकडा कमी झाला आहे. देशात आज ८१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. आज ६०,७२९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

देशात आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा हा ३ कोटी ०३ लाख ६२ हजार ८४८ वर पोहचला आहे. तर मृतांची एकूण संख्या ३ लाख ९८ हजार ४५४ झाली आहे. देशात आजपर्यंत २ कोटी ९४ लाख २७ हजार ३३० रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात सध्या ५ लाख ३७ हजार ०६४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालय किंवा घरीच उपचार सुरु आहेत. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९६.९२ टक्क्यांवर पोहचले आहे.
देशात आत्तपर्यंत ४१ कोटी ०१ लाख ०० हजार ०४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील १९ लाख ६० हजार ७५७ चाचण्या गेल्या २४ तासांत झाल्याचे आयसीएमआरने सांगितले.


 

First Published on: June 30, 2021 10:18 AM
Exit mobile version