Coronavirus India Updates: कोरोनाचा विस्फोट! देशात सलग दुसऱ्या दिवशी १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

Coronavirus India Updates: कोरोनाचा विस्फोट! देशात सलग दुसऱ्या दिवशी १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

Corona : कोरोनाची सौम्य लक्षणे अँटीबॉडी निर्माण करण्यासाठी मदत करतात- संशोधन

देशभरातील कोरोनाचा कहर रोखण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. पण दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत १ लाखांची भर पडत आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज १ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत १ लाख २६ हजार ७८९ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ६८५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ५९ हजार २५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २९ लाख २८ हजार ५७४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६६ हजार ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी १८ लाख ५१ हजार ३९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सध्या ९ लाख १० हजार ३१९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत ९ कोटी १ लाख ९८ हजार ६७३ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.

७ एप्रिलपर्यंत देशभरात २५ कोटी २६ लाख ७७ हजार ३७९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १२ लाख ३७ हजार ७८१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागचे ३० पथकं आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान कोरोना प्रभावित असलेले शहर आणि जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे.


हेही वाचा – Coronavirus Maharashtra: चिंताजनक! कोरोना रुग्णवाढीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या स्थानावर!


 

First Published on: April 8, 2021 11:08 AM
Exit mobile version