Coronavirus: Live update – सीएची परीक्षा पुढे ढकलली; नवीन वेळापत्रक जाहीर

Coronavirus: Live update – सीएची परीक्षा पुढे ढकलली; नवीन वेळापत्रक जाहीर

परीक्षा पुढे ढकलली

कोरोनाचे रुग्ण देशात वाढत असल्यामुळे इंस्टीट्यूट ऑफ़ चार्टड अकॉउंट ऑफ इंडियाने सीएची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. ही परीक्षा मे महिन्यात होणार होती आता ती जून ते जुलैदरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीएच्या विविध अभ्यासक्रमची परीक्षा मे महिन्यात होणार होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. फाउंडेशन कोर्सची परीक्षा २७, २९ जून आणि १, ३ जुलैला होणार आहे. तर  इंटरमीजिएट कोर्स ग्रुप १ ची परीक्षा २०, २२, २४ आणि २६ जूनला होणार आणि ग्रुप २ ची परीक्षा २८,३० जून तसेच २ जुलैला होणार आहे.
इंटरमीजिएट कोर्स ग्रुप १ (नवीन अभ्यासक्रम) याची परीक्षा २०,२२,२४ आणि २६ जूनला होणार आहे. तर ग्रुप २ ची परीक्षा २८ आणि ३० जून, आणि २, ४ जुलै रोजी होणार आहे. इंटरनॅशनल ट्रेड लॉ एंड वर्ल्ड ट्रेड आर्गेनाईजेशन पार्ट १ ची परीक्षा २०,२२ जूनला होणार आहे. तर ग्रुप बीची परीक्षा २४,२६ जूनला होणार आहे. इंटरनॅशनल लॉ टॅक्ससेशन असेसमेंटची परीक्षा २७,२९ जून रोजी होणार आहे.

जगात थैमान घालणाऱ्या करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. तसेच या करोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये, याकरता केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन केला आहे. दरम्यान, ANI ने दिलेल्या वृत्तीनुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ वर गेली आहे. तर मृतांचा आकडा १९ वर गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात देशभरात ९५ रुग्ण वाढले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  
Pradnya Ghogale

‘करोना’ विरोधात सार्वजनिक मंडळे एकवटली

मुंबईसह राज्यात फोफावलेल्या करोनाविरोधात दोन हात करण्यासाठी सरकारनंतर आता मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी देखील एकत्र येण्यास सुरुवात केली आहे.

Pradnya Ghogale

जीवनावश्यक वस्तूंची अधिक दरांनी विक्री केल्यास होणार कारवाई

करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे खबरदारी घेतली जात असून शासकीय आदेशाचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणे गरजेचे असल्याने भाजीपाला, दूध, धान्य, फळे, औषधे आदी जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी प्रशासनाने शिथिलता ठेवली असून काही ठिकाणी जास्त दराने भाजीपाला किराणामाल आदी वस्तुंची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा तक्रारी आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल, असे निर्देश प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिले.

Pradnya Ghogale

एपीएमसी मार्केटमध्ये १ हजार गाड्या दाखल; नागरिकांची तुफान गर्दी

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये १ हजार १०० गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. गर्दी करु नका, असे सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

Pradnya Ghogale

पुण्यात आणखी एक करोनाचा रुग्ण आढळला

पुण्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुण्यात आणखी एक करोनाचा रुग्ण आढळला आहे. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या ५० वर्षीय रुग्णाला करोनाची लागण झाली आहे. या रुग्णाने कोणताही परदेश प्रवास केला नाही. डायबेटीस आणि फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

Pradnya Ghogale

ड्रोनच्या मदतीने शहरावर ठेवणार लक्ष

नापूरमगध्ये करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन ड्रोनच्या मदतीने शहरावर लक्ष ठेवत आहे. संचारबदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणांवरही पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष आहे.

First Published on: March 28, 2020 10:45 AM
Exit mobile version