महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांना कोरोनाचा धोका; 24 तासात 20 हजार रुग्ण

महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांना कोरोनाचा धोका; 24 तासात 20 हजार रुग्ण

कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. यात भारतातही कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढतेय. त्यामुळे रुग्णसंख्या ही 20 हजारांच्या वर पोहचली आहे. वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे लोकांच्या मनात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झालेय. अशा परिस्थितीत देशात कोरोनाची चौथी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त होतेय. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागावरही ताण येतोय. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे.

हेही वाचा : आता 48 तासात कोरोना होणार नष्ट; ग्लेनमार्कने प्रभावी औषध बनवल्याचा दावा

देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आता चार कोटींच्या घरात पोहचला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 20,044 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 18,301 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. अद्यापही देशात 1 लाख 40 हजार 760 कोरोनाच्या अॅटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाचा डेली पॉझिटिव्हीटी रेट 4.80 टक्के झाला आहे.

 


देशात आत्तापर्यंत 5,25, 660 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो रुग्णांना उपचारातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, यानंतर केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि ओडिशामध्येही रुग्णसंख्या वाढतेय. या पाच राज्यांमध्ये कोरोनाचे जवळपास 58.72 टक्के नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान कोरोनाच्या अनेक सब व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सब व्हेरिएंटच्या संशोधनावर शास्त्रज्ञ काम करत आहेत. दरम्यान भारतात नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी दोन लसींनंतर आता पुढील 75 दिवस बुस्टर डोस दिला जाणार आहे.


मुंबईचा मीत शहा सीएच्या परीक्षेत देशात अव्वल

First Published on: July 16, 2022 12:54 PM
Exit mobile version