सावधान! सेक्स केल्यामुळे होतोय कोरोना…

सावधान! सेक्स केल्यामुळे होतोय कोरोना…

फोटो प्रातिनिधिक आहे

चीनमध्ये कोरोना व्हायरसवर एक रिसर्च करण्यात आले. यामध्ये समजले की सेक्स केल्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. याविषयी डॉ. मृणाल पहावा यांनी स्षष्ट केलं आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयीच्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

चीनमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हायरस सेक्स केल्यामुळेही पसरतो यावर बोलतना डॉ. मृणाल पहावा म्हणाल्या की, ३८ जणांवर हा रिसर्च करण्यात आला होता. त्यातील केवळ ६ लोकांमध्ये कोरोना संक्रमण झाल्याचे आढळले. त्या ६ लोकांमधील ४ लोकांना कोरना झाला होता. तर २ जणं कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सेक्समधूनही कोरोनाचे संक्रमण होऊ शकते. पण आत्तापर्यंत कोणताच असा डाटा उपलब्ध नाहीये ज्यामध्ये या गोष्टीविषयी लिहिले आहे. मात्र खात्री आहे याविषयी आणखी रिसर्च करण्यात येईल. पण तरीही मला वाटत नाही की यातून ठोस काहीतरी निकाल येईल.

त्याचबरोबर डॉक्टर म्हणतात या काळात बाळासाठी प्लॅनींग करू नका, तर हे शक्य आहे का? आणि त्यासाठी महिलांनी काय खबरदारी घेतली पाहिजे या विषयी बोलताना डॉक्टर म्हणाल्या, मी पण हेच सांगेन आता जे दाम्पत्य बाळाचं प्लॅनीग करत आहेत. त्यांना हा विचार आता थांबवावा. पण ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी मात्र या काळात जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. जर आई कोरोना बाधीत असेल तर पोटातील बाळाला कोरोना झाला असेलच असं नाही. खूप कमी केसमध्ये बाळाला कोरोना होऊ शकतो. पण ज्या आईला कोरोनाचे गंभीर इन्फेक्शन झाले आहे. त्या आईला अनेक त्रासांचा सामना करावा लागेल. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.


हे ही वाचा – Lockdown – ‘राणादा’मध्ये नाही तर पाठकबाईंचा जीव ‘या’ मध्ये रंगलाय!


 

First Published on: May 13, 2020 5:27 PM
Exit mobile version