राज ठाकरेंच्या टीकेनंतर योगींनी ‘तो’ निर्णय घेतला मागे!

राज ठाकरेंच्या टीकेनंतर योगींनी ‘तो’ निर्णय घेतला मागे!

मनसे प्रमुख राज ठाकरेंचे योगींना उत्तर

काही दिवसांपूर्वी योगी सरकारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमावली तयार करणार असल्याचे जाहीर केले होते. देशात लॉकडाऊन असल्यामुळे देशभरातील मजुरांनी गावची वाट धरली आहे. इतर राज्यात असलेले सर्वाधिक मजूर हे यूपी- बिहार मधील आहेत. त्यामुळेच यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. असे जाहीर केले होते मात्र आता योगी यांनी यू-टर्न घेतला आहे. यूपीमदील कामगारांना नोकरी अथवा कामावर ठेवण्यासाठी यूपी सरकारची परवानगीची गरज नसल्याचे जाहीर केलं आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. या टीकेनंतर आदित्यनाथ यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. अशाप्रकारची कोणतीही अट मायग्रेशन कमिशनमध्ये समाविष्ट करणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कामगारांना कामावर ठेवताना यूपी सरकारची परवानगी घेणं गरजेचं नसणार आहे.

काय होता निर्णय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमावली तयार करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. या पुढे कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची गरज असेल तर त्या राज्याला आधी या कामागांराच्या सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल. आमच्या परवानगीशिवाय त्यांना राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही. काही राज्यांनी ज्या पद्धतीने या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

राज ठाकरेंनी केली होती टीका

योगींच्या त्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी दोन ट्विट करत योगींचा समाचार घेतला. “यापुढे राज्य सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावे. कामगार राज्यात आणताना त्यांची नोंद करावी. पोलीस स्टेशनमध्ये त्यांची ओळख आणि फोटो असले पाहीजेत. तरच त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश द्यावा.” या ट्विटनंतर राज ठाकरे पुढे म्हणाले की, “ते जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण कायद्यानं आपल्याकडे एका मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही याची जाणीव मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठेवावी, महाराष्ट्रानं आणि देशातल्या इतर राज्यांनीही ठेवावी.


हे ही वाचा – Video : जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; पुलवामाची पुनरावृत्ती टळली!


 

First Published on: May 28, 2020 11:55 AM
Exit mobile version