Coronavirus : आता कानावरही होतोय कोरोनाचा प्रभाव, ऐकण्याची शक्ती होतेयं कमी

Coronavirus : आता कानावरही होतोय कोरोनाचा प्रभाव, ऐकण्याची शक्ती होतेयं कमी

Coronavirus : आता कानावरही होतोय कोरोनाचा प्रभाव, ऐकण्याची शक्ती होतेयं कमी

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांसमोरील समस्या कमी व्हायचे नाव घेत नाहीत. अनेक नवनवीन आजारांमुळे कोरोनाबाधित रुग्ण पुन्हा आजारी पडत आहेत. ब्लॅक फंगस, मेंटल डिसऑर्डर, आणि आता अनेक रुग्णांना कानाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. काही रुग्णांना कानात बेल आणि शिट्टी वाजल्याचा आवाज जाणवत आहे. तर काही रुग्णांना ऐकण्यातही अडचणी येत आहेत. शहरांतील नाकांची तपासणी करणाऱ्या खासगी डॉक्टरांकडे कोरोनातून बरे होणारे बरेच रुग्ण तक्रारी घेऊन येत आहेत. यावर फोर्टिस रुग्णालयातील ईएनटी विभाग प्रमुख डॉ.रजत भाटिया सांगतात, कोरोनातून बरे होणाऱ्या ३० ते ५० वर्षे वयोगटातील २० ते ३० टक्के रुग्ण दररोज कानांची तपासणी करण्यासाठी ओपीडीमध्ये येत आहेत. या रुग्णांना घंटी आणि शिट्टीचे आवाज ऐकू येत आहेत. यासमस्येमुळे अनेक रुग्णांना रात्रीची झोप येत नाही. परंतु अशी कानात आवाज येण्याची बरीच कारणे असू शकतात.

नाकातून कानापर्यंत संसर्ग पोहचू शकतो 

याचे एक कारण समोर येत आहे ते म्हणजे कोरोना विषाणू नाकातून संपूर्ण रोगप्रतिकार यंत्रणेवर हल्ला करतो. परंतु यावर अद्याप ठोस पुरावे मिळाले नाहीत. यावर डॉ. रजत यांचे म्हणणे आहे की, नाक आणि कान एकमेकांने खूप जवळ जोडले गेलेले अवयव आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संसर्ग नाकातून शरीरात आला तेव्हा तो कानात गेल्यास इंफेक्शनमुळे प्रभाव दाखवतो. यामुळे कानातील पेशांना इजा होते. तर दुसरे कारण असे असू शकते की, जेव्हा कोरोना विषाणू नाकात येतो तेव्हा तो कोल्ड टाईप सिंड्रम होतो.

सतत हेडफोन्सचा वापर टाळा

तंतू किंवा श्लेष्मामुळे कानात जडपणा किंवा कानाच्या आत भारीपणामुळे कानात वाजल्यासारखे वाटते. या व्यतिरिक्त, कोरोना संसर्गामुळे अनेक रुग्ण होम आयसोलेशन किंवा रुग्णालयात भर्ती होतात. यावेळी एकटेपणा दूर करण्यासाठी काही रुग्ण सतत काही दिवस हेडफोन्सचा वापर करत गाणी ऐकणे किंवा फोनवर बोलत असतात. यामुळे सतत हेडफोन्सचा वापर रुग्णाची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.

रुग्ण वेळेवर उपचार घेण्यास आल्यास या आजारावर उपाय होतात

यावर डॉ. भाटिया सांगतात, रुग्ण वेळेवर उपचार घेण्यास रुग्णालयात आल्यास या आजारावर उपाय आहे. या आजारावर केवळ औषधाची भूमिकाच नाही तर समुपदेशनही केले जाते. यात रुग्ण वावरत असलेल्या वातावरणात बदल केला जातो. तसेच रुग्णास हेडफोन्सचा वापर पूर्णपणे बंद करण्यास सांगून विविध प्रकारचे आवाज ऐकण्यास सांगितले जातात. परंतु रुग्णास बलकुलचं आवाज ऐकण्यास येत नसेल तर श्रवणयंत्राचा वापर करण्यास सांगितले जाते. ज्यामुळे आवाज अधिक जोरात येतो आणि घंटाचा आवाज येणे बंद होते. शेवटच्या टप्प्यात,रुग्णाच्या कानाच्या आतमध्ये स्टीरायड्स इंजेक्शन दिले जाते.

कोरोना रुग्णांच्या श्रवणशक्तीवर होतोय परिणाम

दीप रुग्णालयाच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव कपिला सांगतात की, कोरोनापासून बरे झालेले असे अनेक रुग्ण त्यांच्याकडे येत आहेत, ज्यांना आता एका कानात दुखत असून शिट्टी आणि बेलचा आवाज येत आहे. त्यामुळे हे आवाज आवाज आता कोरोना रुग्णांच्या श्रवणशक्तीवर परिणाम करीत आहे.


 

First Published on: June 15, 2021 2:50 PM
Exit mobile version