देशातील करोनाची सद्यस्थिती – भारतात कोरोनाचा प्रार्दुभाव जलद गतीने!

देशातील करोनाची सद्यस्थिती – भारतात कोरोनाचा प्रार्दुभाव जलद गतीने!

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ११५२ वर पोहचली आहे. तर २७ जाणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत ९६ जाणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी महाराष्ट्रात कोरोनाचे १२ नवे रुग्ण. पुणे ५, मुंबई ३, नागपूर २, कोल्हापूर-नाशिक प्रत्येकी १. राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २१५वर पोहचली आहे. भारतात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. जर अशीच रूग्णांमध्ये वाढ होत राहीली तर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसाला १००च्या वर पोहचली आहे. त्यामुळे देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव जलद गतीने होत असल्याचं दिसून आलं आहे.

महाराष्ट्र, केरळमध्ये संख्या जास्त

भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर जवळपास केरळसह इतर राज्यांमध्ये आढळले आहेत. त्यातही मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात २१५ जाणांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी कोरोनामुळे २ जाणांचा मृत्यू झाला आहे. यात टॅक्सीड्रायव्हरची पत्नी आणि बुलढण्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. या दोघांचे वय ४० च्या आसपास होते.

आत्तापर्यंत मुंबईतील 14, पुण्यातील 15, नागपूर आणि औरंगाबादमधून एक तर यवतमाळमधून तीन असे एकूण 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिल्लीत २३ रूग्ण

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा एक हाजाराच्यावर गेला आहे. सगळ्यात जास्त चिंता दिल्लीमध्ये आहे कारण एकाच दिवशी दिल्लीमध्ये २३ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.

राज्यानुसार कोरोनाग्रस्तांची संख्या

महाराष्ट्र – २१५ रूग्ण आणि २ जाणांचा मृत्यू

गुजरात – ५८ रूग्ण आणि ५ जाणांचा मृत्यू

मध्यप्रदेश – ८ रूग्ण

मेरठ – १२ रूग्ण

नोएडा – ४ रूग्ण

गाझियाबाद – २ रूग्ण

बरेली – १ रूग्ण


हे ही वाचा – जगभरात कोरोनाची सद्यस्थिती : ७ लाख कोरोनाबाधित तर बळींची संख्या घाबरवणारी


 

First Published on: March 30, 2020 12:13 PM
Exit mobile version