Coronavirus Cases Today: कोरोनाचा कहर! देशात २४ तासांत दीड लाख नवे रुग्ण, २७ राज्यांमध्ये पसरला ओमिक्रॉन

Coronavirus Cases Today: कोरोनाचा कहर! देशात २४ तासांत दीड लाख नवे रुग्ण, २७ राज्यांमध्ये पसरला ओमिक्रॉन

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ५९ हजार ६३२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हजार ८६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर आता १०.२१ टक्के झाला आहे. सध्या देशात ५ लाख ९० हजार ६११ सक्रीय रुग्ण आहेत. तसेच दुसऱ्याबाजूला देशात २७ राज्यांमध्ये ओमिक्रॉन पसरला असून ३ हजार ६२३ ओमिक्रॉनबाधितांची संख्या झाली आहे. आतापर्यंत यापैकी १ हजार ४०९ जण रिकव्हर झाले आहेत.

 

देशात आतापर्यंत ३ कोटी ४४ लाख ५३ हजार ६०३ कोरोनाबाधित रिकव्हर झाले असून ४ लाख ८३ हजार ७९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनासोबत लढण्यासाठी १५१.५८ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

मार्च सुरुवातीपासून कोरोना केसेस होणार कमी

सध्या कोरोनाची दहशत जरी भितीदायक असली तरी नव्या गणितीय मॉडलिंगच्या आधारावर गणना केली आहे की, कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण जानेवारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात सर्वाधिक असतील. पण मार्च सुरुवातीपासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागले.

दरम्यान देशात सध्या सर्वाधिक कोरोना सक्रीय रुग्ण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. शनिवारी महाराष्ट्रात ४१ हजार ४३४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आणि १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ९ हजार ६७१ जण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६८ लाख ७५ हजार ६५६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ६२७ जणांचा मृत्यू झाला असून ६५ लाख ५७ हजार ८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात १ लाख ७३ हजार २३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Delhi Corona Blast: संसद भवनात कोरोनाचा विस्फोट; ४००हून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह


 

First Published on: January 9, 2022 10:29 AM
Exit mobile version