Coronavirus – कंडोम साठवण्याकडे ग्राहकांचा कल, भारतात खप वाढला!

Coronavirus – कंडोम साठवण्याकडे ग्राहकांचा कल, भारतात खप वाढला!

करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात २१ दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला. अनेक सार्वजनिक ठिकाणे यामध्ये मॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव यासारख्या सुविधा आठवडाभरापासून अधिक काळापासून बंद आहेत.  अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे. मुंबईची लाईफ लाईन लोकल बंद आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू या लॉकडाऊनच्या काळातही नागरिकांना मिळणार आहेत. तरीही गरजेच्या गोष्टींचा साठा करून ठेवण्याकडे ग्राहकांचा कल आहे. काल रात्री लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ग्राहकांनी दुकानात गर्दी केली होती. मात्र मागील काही आठवड्यांपासून कंडोमच्या विक्रीमध्येही झपाट्याने वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

अनेकजण घरीच असल्याने अन्नधान्य आणि घरगुती वापराच्या वस्तूंचा साठा करत आहे. त्याचबरोबर कंडोमचा ही साठी ग्राहक करून ठेवत असल्याचही लक्षात आलं आहे. या आधी कंडोम खरेदी करण्याची संख्या कमी होती. मात्र आता औषध, अन्नधान्याप्रमाणे ग्राहक कंडोमचाही साठा करत असल्याच विक्रेत्याने सांगितलं. यात प्रामुख्याने १० ते २० कंडोम असणाऱ्या पाकिटांचा खप मोठ्याप्रमाणात वाढला आहे

या आधी वर्षाआखेरीस, नववर्षात,समासुदीच्या दिवसात कंडोमच्या विक्रीत वाढ होत असे. पण सध्या करोनाच्या भितीमुळे लोकं नेहमी लागणाऱ्या औषधांबरोबरच कंडोमचीही खरेदी करताना दिसत आहेत. कंडोमची वाढती मागमी बघून दुकानदारांनी देखील कंडोमची साठवणूक २५ टक्क्यांनी वाढविली आहे. दिल्लीमधील एका औषध विक्रेत्याने मागील आठवड्याभरापासून गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे निरिक्षण नोंदवलं आहे.

“जे लोकं आधी कंडोमचं एक पाकीट न्यायचे ते आता दोन दोन पाकीटं घेऊन जातात. या गोष्टींचा खप मागील एक दोन आठवड्यांपासून बऱ्याच प्रमाणात वाढला आहे. खास करुन मॉल्स बंद झाल्यापासून या गोष्टी मेडिकलमधून खरेदी करण्याचे प्रमाण वाढलं आहे. असे एका दुकानदाराने सांगितले. एका व्हायरसमुळे कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीमध्ये एवढ्या झपाट्याने वाढ होईल असा कधी विचारही केला नव्हता असही तो पुढे म्हणाला.

First Published on: March 25, 2020 11:41 AM
Exit mobile version