अंदमान बेटावरही कोरोनाचा शिरकाव, पाच जण कोरोनाबाधित!

अंदमान बेटावरही कोरोनाचा शिरकाव, पाच जण कोरोनाबाधित!

अंदमान

ग्रेट अंदमानी या विशेष धोकादायक आदिवासी जमातीतील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, अंदमानातील दुर्गम भागातील आदिवासींमध्ये संसर्गाची ही पहिलीच घटना असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. येथील आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक अभिजीत रॉय म्हणाले की, बाधितांना येथील विलगीकरणात हलविण्यात आले आहे. त्यापैकी चार पुरूष, तर एक महिला आहे. ते सर्वजण यंत्रणांना सहकार्य करीत असून, त्यांना कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत.

गेल्या आठवड्यात सर्वांची चाचणी करण्यात आली तेव्हा या पाच जणांना लागण झाल्याचे उघड झाले. ग्रेट अंदमानी, ओंगी, जारवा, शोम्पियन, उत्तर सेंटिनेल या पाच जमाती पीव्हीटीजीएस अंतर्गत येतात. ग्रेट अंदमानी जेरू बोलीभाषा बोलतात. अंदमान अदिम जनजाती विकास समितीने २०१२ मध्ये केलेल्या अभ्यासात त्यांची संख्या ५१ असल्याचे उघड झाले आहे.

ग्रेट अंदमानी त कोरोना पोहच्याचे उघड झाले आहे. त्यांच्यातील काही जण रोजगारासाठी पोर्ट ब्लेअर ते स्टेट आयलंड असा प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्यात संसर्ग झाला असल्याचा अंदाज आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्या आहेत.

– अभिजीत रॉय, उपसंचालक, आरोग्य संचालनालय

डॉ. रॉय म्हणाले, प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी जारवांना पश्चिम किनाऱ्यावरील जारवा आदिवासी क्षेत्रात हलविले आहे. ओंगी जमातीसाठी चाचणी केंद्र उभारण्यात आले आहे. शोम्पियन आणि उत्तर सेंटिनेल या जमाती अति दुर्गम भागात व एकांतात राहत असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.

अंदमान आणि निकोबार बेटांवर २५ ऑगस्टपर्यंत बाधितांची संख्या २,९४५ असून ३७ मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. ‘ग्रेट अंदमानीं’त कोरोना पोहोचल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यातील काही जण रोजगारासाठी पोर्ट ब्लेअर ते स्ट्रेट आयलंड असा प्रवास करीत विविध कामे करतात. त्यामुळे त्यांच्यात संसर्ग झाला असल्याचा अंदाज आहे.

First Published on: August 28, 2020 5:40 PM
Exit mobile version