कोरोना अधिक गंभीर होतोय! आता थेट मेंदूवर हल्ला करतोय

कोरोना अधिक गंभीर होतोय! आता थेट मेंदूवर हल्ला करतोय

प्रातिनिधिक छायाचित्र

जगभरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रूग्णांचा आकडा रूग्णांचा आकडा जवळपास सव्वा कोटींच्या जवळ पोहचला आहे. यातील ७० लाख रूग्ण बरे झाले आहेत. कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. मात्र आता कोरोना अधिकाधिक धोकादायक होत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

कोरोनाचा विषाणु फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे श्वासोच्छवासात समस्या निर्माण होते. मात्र आता थेट मेंदूवर हल्ला करेल, अशा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. कोरोना विषाणुमुळे मेंदूशी संबंधिक विविध आजारांशी सामना करावा लागू शकतो. अशी धोक्याची सूनचा संशोधकांनी दिली आहे. यूएलसीमधील संशोधकांनी ४३ कोरोना रूग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या रूग्णांना स्ट्रोक, मेंदू आणि मज्जातंतूच्या आजारांचा सामना करावा लागत असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली.

कोरोनामुळे मेंदूला धोका पोहचत असल्याचं संशोधकांनी सांगितलं. कोरोनामुळे निर्माण झालेला धोका १९२० आणि १९३० मध्ये आलेल्या महामारीसारखा आहे का याबद्दल संशोधन सुरू आहे. अशी माहिती यूसीएलच्या न्यूरोलॉजी विभागाच्या मायकल झंडी यांनी दिली. कोरोना विषाणु फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र आता कोरोना थेट मेंदूवर हल्ला करत असल्याचे पुरावे सापडू लागले आहेत.


हे ही वाचा – हवेमार्फत पसरतो कोरोना, WHO ने केले मान्य!


 

First Published on: July 8, 2020 4:55 PM
Exit mobile version