WHO चा इशारा! कोरोनावर रामबाण औषध कदाचित मिळणारच नाही

WHO चा इशारा! कोरोनावर रामबाण औषध कदाचित मिळणारच नाही

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयेसस

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सोमवारी असा इशारा दिला की, कोरोनावरील लसीचा कोणताही दावा आतापर्यंत करण्यात आलेला नाही, यासह कोविड -१९ च्या प्रभावी उपचारांचा मार्ग देखील अद्याप दूर आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी असे सांगितले की, कोरोनाची गंभीर परिस्थिती सामान्य होण्यास बराच काळ लागेल. परंतू, कोरोनावरील रामबाण औषध कदाचित मिळणारच नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, कोरोना विषाणूविरूद्ध तयार करण्यात आलेल्या लसीचे परिणाम दिलासादायक असले तरी कोरोनावरील रामबाण उपाय अद्याप निर्माण झालेला नाही. जीवघेण्या कोरोनाशी सामना करताना जग पुन्हा सामान्य होण्यास बराच काळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस आणि आपत्कालीन प्रमुख माइक रायन यांनी जगातील सरकारांना सांगितले की त्यांनी कठोर पावले उचलली पाहिजेत. तसेत त्यांनी आवश्यकतेनुसार मास्क घालण्याचे उपाय, सामाजिक अंतर, हात धुण्यास आणि चाचण्या घेण्याचे त्यांनी उपाय सुचविले आहेत.

जिनेवामध्ये डब्ल्यूएचओच्या मुख्यालयातून वर्चुअल न्यूज ब्रिफिंगच्या माध्यमातून त्यांनी सांगितले, “बऱ्याच देशातील लसींची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी दरम्यानची प्रक्रिया सुरू आहे आणि आम्ही आशा करतो की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी या लसींचा वापर केला जाऊ शकतो. मात्र अशा परिस्थितीत कोरोनावरील कोणताही रामबाण उपाय समोर आलेला नाही कदाचित तो नसेलही.”


Covid Pandemic: कोरोना दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO चा इशारा!
First Published on: August 4, 2020 9:27 AM
Exit mobile version