CoronaVirus- मोदी सरकारचा नवा प्लॅन, रेल्वे बोगीतच उभारणार ‘ICU’!

CoronaVirus- मोदी सरकारचा नवा प्लॅन, रेल्वे बोगीतच उभारणार ‘ICU’!

भारतात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित महिलेला पुन्हा कोरोनाचा संसर्ग, प्रकृती स्थिर

भारतात आतापर्यंत १७ जाणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात १३५ च्यावर कोरना रूग्ण आहेत. केंद्र सरकारकडून  प्रदुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  याचच पहिलं पाऊल म्हणजे देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण आता देशातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी आणि जर भविष्यात करोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारनं रेल्वेतच विविध मेडिकल सुविधांची तयारी सुरू केली आहे.

रेल्वेची बोगी होणार हॉस्पिटलची रूम

रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. जेणेकरून या हलाकीच्या परिस्थितीत सेवा प्रवाशांपर्यंत वेळेत पोहचण्यास मदत होईल. कारण भारतामध्ये रेल्वेचे जाळे सर्वदूर पसरले आहे. त्यामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाल्यास ग्रामीण भागांतील रूग्णांसाठी याचा फायदा जास्त होईल.

सरकार सतर्क होऊन आता उपाययोजना करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सराकारने यावरील उपाय योजानांची तयारी सुरू केली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केरळमधील कोच्ची येथे असणाऱ्या फार्मने पंतप्रधान कार्यालायाला या योजनेसाठीचा प्रस्ताव पाठवला.

काय आहे प्रस्ताव

१२,१६७ रेल्वे आहेत. त्यात २० ते ३० बोगी आहेत. आम्ही त्या सर्वांना मोबाईल हॉस्पिटलमध्ये बदलू शकतो. त्यामध्ये सर्व मेडिकल सुविधांसह आय़सीयू, क्वारंटाईन वार्ड आणि आयसोलेशन सेंटर उपलब्ध करून देऊ शकतो. एका बोगींमध्ये १००० बेडची व्यवस्था होऊ शकते.

First Published on: March 27, 2020 12:35 PM
Exit mobile version