corona update : देशातील कोरोना रुग्णसंख्येस ब्रेक, आज १ लाख १४ हजार ४६० नवे रुग्ण तर २६७७ मृत्यांची नोंद

corona update : देशातील कोरोना रुग्णसंख्येस ब्रेक, आज १ लाख १४ हजार ४६० नवे रुग्ण तर २६७७ मृत्यांची नोंद

देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याचे पाहयला मिळत आहे. तर नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस घट होतेय. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत होणारी घट पाहता देशात कोरोनास्थिती कंट्रोलमध्ये येत आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख १४ हजार ४६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येचा आकडा खाली पोहचला आहे. तर २ हजार ६७७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या घटणाऱ्या प्रमाणाबरोबरच कोरोना मृतांच्या आकडेवारीत चढ उतार पाहयला मिळतोय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत १ लाख १४ हजार ४६० नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात २ हजार ६७७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाली आहे. देशात आज १ लाख ८९ हजार २३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९०.३४ टक्के झाले आहे.

भारतातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या २ कोटी ८८ लाख ०९ हजार ३३९ झाली आहे. तर देशात २ कोटी ६९ लाख ८४ हजार ७८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ४६ हजार ७५९ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.देशात सध्या १४ लाख ७७ हजार ७९९ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासह आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २३ कोटी १३ लाख २२ हजार ४१७ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, ५ जून २०२१ पर्यंत देशात एकूण ३६ कोटी ४७ लाख ४६ हजार ५२२ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील २० लाख ३६ हजार ३११ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.


coronavirus : लसीकरण मोहिम थंडावल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट येणार,आरोग्य तज्ज्ञांचा इशारा


 

First Published on: June 6, 2021 10:11 AM
Exit mobile version