Live Update: गावस्करांच्या कसोटी पदापर्णाच्या ५० व्या वर्षानिमित्त एमसीएच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर गौरव

Live Update:  गावस्करांच्या कसोटी पदापर्णाच्या ५० व्या वर्षानिमित्त एमसीएच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर गौरव
गावस्करांच्या कसोटी पदापर्णाच्या ५० व्या वर्षानिमित्त एमसीएच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर गौरव
मुंबई पोलीस सचिन वाझेंची चौकशी करणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी २३ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्रींना देखील कोरोनाची लागण झाली होती. राज ठाकरे यांनी कोरोना विरोधी लसीचे दोनही डोस घेऊन त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
आर्यन खानची उद्या होणार जेलमधून सुटका
अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा उद्या जेलमधून सुटणार
एका तासानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान जेल बाहेर येणार
बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला एनडीपीएस कोर्टात पोहोचली.
थोड्याच वेळात आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून होणार सुटका
आर्यनचा १ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यनच्या जामीनाबाबत पाच पानांचा आदेश जारी केला आहे.
साऊथचे सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन
कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पुनीत राजकुमार यांना आज सकाळी ११.३० वाजता छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करम्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार केले जात असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती बेंगळुरूमधील विक्रम हॉस्पिटचे डॉ. रंगनाथ नायक यांनी दिली.
गेल्या २४ तासांत १४ हजार ३४८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ८०५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १३ हजार १९८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ कोटी ४२ लाख ४६ हजार १५७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ५७ हजार १९१ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ३६ लाख २७ हजार ६३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १ लाख ६१ हजार ३३४ जणांवर उपचार सुरू आहेत.
बॉलिवूडला महाराष्ट्राबाहेर नेण्याचा डाव – नवाब मलिक
काशिफ खानवर कारवाई करण्यास समीर वानखेडेंनी रोखलं, मलिकांचा आरोप
लढाई कुटुंबीय किंवा धर्माविरोधात नाही, तर अन्यायाविरोधात आहे – नवाब मलिक
#Live: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पत्रकार परिषद लाईव्ह #Live: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पत्रकार परिषद लाईव्ह #Live: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पत्रकार परिषद लाईव्ह Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, October 28, 2021
 
कुटुंबियांना गोवालं जात असल्याचा समीर वानखेडेंचा चुकीचा आरोप – नवाब मलिक
थोड्याच वेळात  अल्पसंख्याक नवाब मलिक आज पुन्हा एक मोठा खुलासा करणार आहेत.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज फैसला होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी ईडी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ईडीकडून बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याची मागणी या याचिकेतून केली होती. याच याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खान मुलगा आर्यन खानचा २५ दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचालाही जामीन मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात यासंदर्भात काल, गुरुवारी सुनावणी पार पडली. आज किंवा उद्या आर्यन खान आर्थररोड तुरुंगाबाहेर येईल अशी माहिती मिळत आहे. सविस्तर वाचा 
First Published on: October 29, 2021 7:40 PM
Exit mobile version