Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनके देशांमध्ये लसींवर सातत्याने संशोधन सुरु आहे. दरम्यान भारतातही लसीकरण मोहिम वेगाने सुरु झाली असून सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु आहे. देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूडने आणि ऑक्सफर्ड अॅस्ट्रॉझेनेकासह मिळून तयार केलेली कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन लस दिली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्नभूमीवर केंद्र सरकारने मोठी घोषणा करण्याची शक्य़ता आहे. यात कोव्हिशील्ड लसीचा दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांपर्यंत वाढण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका आंतरराष्ट्रीय समितीने गोळा केलेल्या पुराव्यांचा आधारे सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या पुरव्यांमध्ये दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लस अधिक प्रभावी ठरु शकते असा दावा करण्यात आला आहे.

या समितीने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस ६ आठवड्यांच्या आत दिला तर त्याची परिणामकारकता ५५.१ टक्के इतकीच होत आहे. मात्र हे अंतर ६ आठवड्यावरून जर १२ केले तर लसीची परिणामकारकता ८१.३ टक्के इतकी प्रभावी ठरत आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतरात वाढ केल्यास दोन प्रकारे दिलासा मिळतो. एक म्हणजे लस देण्यास जास्त अवधी मिळाल्याने लसींचा पुरवठा वाढण्यात येईल जेणे करुन किंमतीही कमी किंवा स्थिर होण्यास मदत होऊ शकते. तर दुसरा म्हणजे पहिल्या डोस घेणाऱ्यांसाठी देशात लसींचे मुबकल प्रमाणात
वितरण करता येणार आहे.

अनेक देशांनी लसीकरणात मोठे अंतर ठेवत बहुतांश नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. यात ब्रिटन देशानेही दोन डोसमधी अंतर १२ आठवड्यांपर्यंत ठेवले आहे तर कॅनडामध्ये हे अंतर १६ आठवड्यांपर्यंत आहे. त्यामुळे कंपनीनेहा असा दावा केला आहे की, जर लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर १२ आठवड्यांपेक्षा अधिक असल्यास लसीचा प्रभाव किंवा परिणामकारकता २८ टक्क्यांनी वाढते.

दरम्यान कोव्हिशील्ड लस निर्मित करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या आधी दोन लसीचा डोसमधील अंतर ४ ते ५ आठवड्यांवरून ६ते ८ आठवडे केले आहे. याबाबत एप्रिल महिन्यातच तज्ज्ञांनी निर्णय घेतला होता. तज्ज्ञांचे असं म्हणणं आहे, की लसीचा दोन डोसमधील अंत वाढल्यास लसीच्या पुरवठा साखळीवरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि यामुळे लसीकरणाच्या नव्या टप्प्यात फायदा होईल.


बारामतीप्रमाणे पुण्यातही रुग्णसंख्या वाढणाऱ्या ठिकाणी लॉकडाऊन गरजेचा, प्रशासनाला सूचना – अजित पवार

First Published on: May 7, 2021 4:21 PM
Exit mobile version