खुशखबर ! अमेरिकेत करोना लसीवर संशोधन

खुशखबर ! अमेरिकेत करोना लसीवर संशोधन

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या करोना व्हायरसने जगभरात पाच हजार सातशे त्रेचाळीस लोकांचा बळी घेतला. या व्हायरसला रोखण्यासाठी अमेरिकेत संशोधन सुरू असून करोना लसीची चाचणी मानवावर करण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी होईल असा विश्वास अमेरिेकेने व्यक्त केला आहे. चाचणी यशस्वी झाल्यास जगभरात या लसींचे वाटप करण्यात येईल असे अमेरिकेच्या ‘द नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ’ तर्फे सांगण्यात आले आहे.

सिएटल येथील कॅन्सर पर्मानेंट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये करोनावरील लसींचे संशोधन सुरू आहे. अमेरिकेत आतापर्यंत २७९४ लोकांना करोनाची लागण झाली असून ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आज १६ मार्च रोजी मानवावर करोना लसीची चाचाणी करणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास हा व्हायरस प्रत्यक्षात आणण्यास एक ते १८ महिन्यांच्या कालावधी लागणाऱ आहे. पहिल्या टप्प्यात ४५ तरुणांना ही लस देण्यात येणार आहे. त्यांच्यावर लसीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात करोना लस उपलब्ध करून दिली जाईल असे अमेरिकेने जाहीर केले आहे. या लसींच्या दुष्परिणामांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. सध्या संपू्रण जगात १६२, ७७४ जणांना करोनाची लागण झाली आहे. यातील ६४६० नागरिकांचा मृत्यू झाला असून चीननंतर सर्वाधिक नुकसान इटलीचे झाले आहे.

First Published on: March 16, 2020 1:27 PM
Exit mobile version