Coronavirus : कोरोनाचा ‘हा’ नवा व्हेरियंट ठरतोय आता अतिशय धोकादायक, शरीरातील प्लाझ्मापासून ते अँटीबॉडी करतोय कमी

Coronavirus : कोरोनाचा ‘हा’ नवा व्हेरियंट ठरतोय आता अतिशय धोकादायक, शरीरातील प्लाझ्मापासून ते अँटीबॉडी करतोय कमी

जगभरात कोरोना विषाणुचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होतेयं.कोरोना विषाणुच्या नवनव्या व्हेरियंटमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढवत आहेत. यात कोरोनाचा विषाणुच्या डेल्टापेक्षा आणखीन एका घातक व्हेरियंट समोर आला आहे. हा विषाणु शरीरातील प्लाझ्मापासून ते अँटीबॉडीवर झपाट्याने हल्ला करत रोगप्रतिकारशक्ती कमी करतोयं. एका संशोधनानुसार, हा सार्स-सीओवी-2 (SARS CoV-2) एप्सिलॉन व्हेरियंटच्या स्पाइक प्रोटीनमधील तीन म्यूटेशनमुळे हा व्हेरियंट कोरोनाविरोधी लसीपासून स्वत:चे संरक्षण करत आहे. म्युटेशमुळे तयार झालेल्या या व्हेरियंटचे नाव CAL.20C असे आहे. सध्या या व्हेरियंटमुळे आरोग्य यंत्रणेसमोरील चिंता अधिक वाढली आहे. यूकेच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, हा प्रकार डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक आहे. या नव्या C.37 व्हेरियंटला स्ट्रेन म्हणून ओळखले जात आहे. या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण पेरू देशात आढळला आहे.

जगभरातील ३० देशांमध्ये याचा प्रसार झाला

लोकांच्या मनात आधीपासूनचं डेल्टा व्हेरियंटमुळे भीती निर्माण झाली आहे, परंतु आता एक नवीन व्हेरियंट समोर आला आहे. या नवीन व्हेरियंटचे नाव लॅम्बडा व्हेरियंट असे आहे. जगभरातील ३० देशांमध्ये याचा प्रसार झाला आहे, परंतु भारतात अद्यात या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

तीन सर्वाधिक घातक व्हेरियंटवर करण्यात आले संशोधन 

कोरोनाविरोधी लस घेणाऱ्या नागरिकांना जर या व्हेरियंटमुळे कोरोना संसर्ग झाल्यास त्यांच्या शरीरातील प्लाझ्मा आणि अँटीबॉडी कमी झपाट्याने कमी होत आहेत. एका अभ्यासात असे दिसून आले की, कॅलिफोर्नियामध्ये गेल्यावर्षी मे महिन्यात एप्सिलॉन व्हेरियंटचे रुग्ण वाढत होते. त्यानंतर २०२० या वर्षातील उन्हाळ्यात या व्हेरियंटचे B.1.427/B.1.429 व्हेरियंटमध्ये बदल झाला आणि संपूर्ण अमेरिकेत पसरु लागला. त्यानंतर जवळपास ३४ देशांमध्ये नवनव्या व्हेरियंटची नोंद करण्यात आली. यामुळे नुकतीच मानवी शरीरावर परिणाम करणाऱ्या तीन सर्वाधिक घातक व्हेरियंटवर संशोधन करण्यात आले.

या संशोधनात ज्या रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे तसेच ज्या लोकांचे लसीकरण पुर्ण झाले आहेत अशा लोकांच्या प्लाझ्मातील एप्सिलॉन व्हेरियंटविरूद्ध चाचणी करण्यात आली. यावेळी एप्सिलॉन व्हेरियंटविरुद्ध प्लाझ्माची क्षमता सुमारे २ ते ३.५ पटीने कमी झाली होती असे दिसून आले. व्हेरियंटच्या बदल्या म्यूटेशनचे परिणामस्वरुप पाहण्यासाठी चाचण्या केल्या जात असल्याचे संशोधकांनी सांगितले, परंतु १० पैकी १० ही चाचणी अयशस्वी झाल्या. कोरोनाचे दररोज नवीन व्हेरियंट समोर येत आहेत. यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेलाही ताण येत आहे. यात कोरोना विषाणूच्या या नवीन व्हेरियंटची प्रसरण क्षमता सर्वाधिक आहे.


 

First Published on: July 7, 2021 5:34 PM
Exit mobile version