कोरोना सर्व्हे करणाऱ्या आशा सेविकेवर हल्ला, सहकार्य न करण्याच्या मशिदींमधून घोषणा

देशभरात कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी दिवस रात्र रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना सुरु असतानाच अशीच एक घटना बंगळुरू मध्ये घडली आहे. येथे कोरोना रुग्णांवर सर्व्हे करण्यासाठी मशीद परिसरात गेलेल्या आशा सेविकेवर स्थानिकांनी हल्ला केला. तसेच तिला कसलीही माहिती न देण्याची घोषणाही मशीदीतून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कृष्णावेणी असे तिचे नाव आहे.

कोरोनाचा फैलाव होत असल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण लॉकडाऊन असतानाही दिल्लीत निजामुद्दीन येथे तबलीगी जमातीच्या मरकजमध्ये हजारोंच्या संख्येने लोक देश विदेशातून आली. नंतर यातील बरेचजण गावी परतले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शोध घेण्यात येत आहे. यामुळेच कृष्मावेणी सर्वे करण्यासाठी गेल्या होत्या. तेते एक कोरोना पॉझीटीव्ह रु्ग्ण आढळला. यामुळे आम्ही तेथे सर्व्हे सुरु केला. पण काहीजण अचानक कृष्णावेणी यांच्या दिशेने धावून आले. काहींनी त्यांची पर्स व मोबाईल खेचला व त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर मशीदीमधून मला सहकार्य न करण्याची घोषणा करण्यात आल्याचे कृष्णावेणी यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

First Published on: April 3, 2020 6:16 PM
Exit mobile version