मूल जन्माला घातले नाही तर…, दांपत्याची आजी-आजोबा होण्यासाठी ‘ही’ मागणी

मूल जन्माला घातले नाही तर…, दांपत्याची आजी-आजोबा होण्यासाठी ‘ही’ मागणी

couple's demand in High Court is to pay Rs 5 crore if the child is not born

हरिद्वारमधल्या एका दांपत्याने आपला मुलगा आणि सूनेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या दांपत्याने आपला मुलगा आणि सून मूल जन्माला घालत नसल्यामुळे कोर्टात याचिका दाखल केली आहे. यात जर मूल जन्माला घातले नाही तर पाच कोटींची भरपाई द्यावी अशी दांपत्याने मागणी केली आहे.

वडील एस आर प्रसाद आमि त्यांची पत्नीने नातवंड हवीत अशी मागणी करत मुलगा आणि सूनेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सर्व पैसा मुलाचे शिक्षण आणि त्यांच्या प्रशिक्षणातवर खर्च केल्यानंतर आपल्याला आर्थिक समस्या जाणवत असल्याचे दांपत्याने म्हटले आहे.

मी माझा सर्व पैसा मुलाला दिला. अमेरिकेत त्याला प्रशिक्षण दिले. माझ्याकडे आता पैसा शिल्लक नाही. आम्ही बँकेतून कर्ज काढून घर बांधले. आम्ही आर्थिकदृष्ट्या आणि वैयक्तिकदृष्ट्या त्रस्त आहोत. त्यामुळे आम्ही याचिकेत मुलगा आणि सूनेकडून प्रत्येकी अडीच कोटींची मागणी केली असल्याचे एस आर प्रसाद यांनी सांगितले. २०१६ मध्ये मुलाचे लग्न झाले. त्यानंतर आम्हाला नातवंडांसोबत खेळायला मिळेल अशी आशा होती. मुलगा किंवा मुलगी काहाही असो आम्हाला फक्त नातवंड हवे आहे, असे ते म्हणाले.

ही केस समाजाला आरसा दाखवणारी आहे. आपण आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो, त्यांना चांगल्या कंपनीत काम करु शकतील इतके त्याला लायक बनवतो. पालकांची आर्थिक काळजी घेणे मुलांची जबाबदारी आहे. दांपत्याने एक वर्षात नातवंड द्या किंवा पाट कोटी द्या अशी मागणी केली आहे, असे वकील ए के श्रीवास्तव म्हणाले.

First Published on: May 12, 2022 5:08 PM
Exit mobile version