अल्पदरात कोव्हॅक्सिन फार दिवस नाही

अल्पदरात कोव्हॅक्सिन फार दिवस नाही

Covaxin

फार काळ केंद्र सरकारला १५० रुपये प्रति डोस किमतीवर ‘कोव्हॅक्सिन’ लस देता येणार नाही, असे लसींचे उत्पादन करणार्‍या भारत बायोटेकने म्हटले आहे.

कोव्हॅक्सिन ही करोनाविरुद्ध वापरात आलेली पहिली भारतीय लस आहे. केंद्राला दिलेल्या दरामुळे खासगी क्षेत्रात किंमत वाढत आहे असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे फार काळ केंद्र सरकारला अल्पदरात लसींचा पुरवठा करता येणार नाही असे भारत बायोटेकने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात जेव्हा केंद्र सरकारने राज्यांच्या खरेदीचा २५ टक्के वाटा आपल्याकडे घेतला होता. त्यानंतर आता लस कंपन्यांनी ही मागणी केली आहे. भारत बायोटेक राज्य सरकारांना प्रति डोस ४०० रुपये आणि खासगी रूग्णालयात १,२०० रुपये प्रति डोस दराने देत आहे.

First Published on: June 16, 2021 8:21 AM
Exit mobile version