Coronavirus: ‘लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे दिल्लीतील कोरोनाचे रुग्ण वाढले’

Coronavirus: ‘लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे दिल्लीतील कोरोनाचे रुग्ण वाढले’

देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत १० क्रमांकावर पोहोचला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज किंवा उद्या जाणारा कोरोनाचा हा आजार नाही. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे राजधानी दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आठवड्याभरात दिल्लीत ३ हजार ५०० रुग्ण वाढले आहेत. परंतु चिंता करू नका. कोरोनामुळे मृत्यूची संख्या कशी कमी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

दिल्लीतील कोरोनाबाधितांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. दिल्लीत आजपर्यंत १३ हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत सहा हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये ३ हजार ८२९ बेड्सची व्यवस्था आहे. त्यापैकी काहीजणांचा ऑक्सिजनची सुविधा पुरवण्यात आली आहे. यामध्ये दीड हजार बेड्सचा वापर करण्यात आला असून उर्वरित बेड्स हे रिकामी आहे. तसेच दोनशेहून अधिक व्हेंटिलेटर असून त्यापैकी ११ वापरले आहेत. शिवाय खासगी हॉस्पिटमध्ये ६०० हून अधिक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी दिली.

ज्या हॉस्पिटलने कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला आहे. त्यांना नोटीस बजवण्यात आली आहे. कोरोनाच्या रुग्णांना रुग्णवाहिकेने हॉस्पिटलला पोहोचवणे ही हॉस्पिटलचे कर्तव्य आहे, असे केजरीवाल म्हणाले.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनाबाधित रुग्ण ११ दिवसांनंतर विषाणूचा संसर्ग पसरवू शकत नाही – वैज्ञानिकांचा दावा


 

First Published on: May 25, 2020 3:20 PM
Exit mobile version