यूकेमध्ये कोरोनाचा हाहाकार; नवे रुग्ण आणि मृत्यूंच्या प्रमाणात वाढ

यूकेमध्ये कोरोनाचा हाहाकार; नवे रुग्ण आणि मृत्यूंच्या प्रमाणात वाढ

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असला तरी, इतर देशांत अद्यापही कोरोना हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरस संसर्ग विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यामुळे यूकेमध्ये रुग्णालयात भरती होणाऱ्या नव्या रुग्णांमध्ये आणि मृत्यूच्या प्रमाण पुन्हा वाढत आहे. १९ ते २६ मार्चपर्यंत येथे कोरोनाचे सुमारे ५० लाख नवीन रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या या नवीन प्रकारामुळे रूग्णालयांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. जरी वर्षाच्या सुरुवातीला मृत्यूची संख्या सध्याच्या प्रकरणांपेक्षा तुलनेने कमी असली. तरी आकडेवारीनुसार, फेब्रुवारीच्या अखेरीपासून नवीन संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमधील सर्व कोरोना निर्बंध रद्द केले. तेव्हापासून संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ब्रिटनमध्ये ५० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या दिवशी ब्रिटीश सरकारने लिव्हिंग विथ कोविड योजनेअंतर्गत इंग्लंडमधील बहुतेक लोकांसाठी मोफत जलद कोविड चाचणी समाप्त केली त्या दिवशी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. ब्रिटनमध्ये १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ६७ टक्के नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत इशारा दिला असून, या इशाऱ्यानंतर जगाची चिंता वाढली आहे. संघटनेनं दावा केला आहे की कोरोनाचा नवीन XE प्रकार पसरत आहे जो Omicron च्या BA.2 पेक्षा १० पट जास्त धोकादायक आहे.


हेही वाचा – Weather Update : राज्यात येत्या ४-५ दिवसात जोरदार वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

First Published on: April 3, 2022 6:54 PM
Exit mobile version