आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी ‘उबर’चा पुढाकार; १५० गाड्यांची फ्री सर्विस उपलब्ध

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी ‘उबर’चा पुढाकार; १५० गाड्यांची फ्री सर्विस उपलब्ध

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीसाठी 'उबर'चा पुढाकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह तसेच इतर कामगार वर्गास वेळेत आपले कर्तव्य बजवता यावे यासाठी मुंबईत बेस्ट वाहतूक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून एसटी बसेसच्या जादा फेऱ्यांची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र आता कोरोना व्हायरसच्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना विश्वासार्ह्य ट्रान्सपोर्टसह सुरक्षित प्रवास मिळावा याकरता उबरने पुढाकार घेतला आहे. नॅशनल हेल्थ अथॉरिटी एनएचए ही एक सरकारी एजन्सी असून आयुष्मान भारत योजनेसाठी अंमलबजावणी करणार्‍या सर्वोच्च संस्थेने शुक्रवारी कोरोना रूग्णांच्या उपचारांसाठी झटणाऱ्या भारताच्या आरोग्य सेवेसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक पुरवण्यासाठी उबर इंडियाबरोबर भागीदारीच्या कराराची घोषणा केली.

डॉक्टरांसाठी १५० गाड्यांची फ्री सर्विस

या करारांतर्गत उबर सुरुवातीच्या टप्यात दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ, प्रयागराज आणि पाटना येथील डॉक्टरांसाठी १५० गाड्यांची फ्री सर्विस उपलब्ध करून देणार आहे. सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणाऱ्या उबरच्या गाड्यांमध्ये कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना उपलब्ध असणार आहेत.

अशी असेल उबरची सुविधा

ड्रायव्हर आणि प्रवाशी यादोघांमध्ये प्लास्टिकचे एक प्रोटेक्टिव बॅरियर असणार आहे. तसेच प्रत्येक प्रवाशी उतरल्यानंतर म्हणजेच, प्रत्येक फेरीनंतर कारला डिसइन्फेक्ट करण्यात येणार आहे. तसेच ‘उबरला मधील प्रत्येक ड्रायव्हरला ट्रेनिंग दिली असून त्यांना सॅनिटायझर आणि मास्क सारख्या आवश्यक गोष्टी देखील पुरवण्यात आल्या आहेत, असे उबर इंडिया आणि दक्षिण आशियाई प्रेसिडं प्रदीप परमेश्वरन (Pradeep Parameswaran, president) यांनी सांगितले.


कोरोनाचा फैलावः देशात रुग्णांचा आकडा २९०२ वर पोहोचला
First Published on: April 4, 2020 1:49 PM
Exit mobile version