धक्कादायक! भारतात कोरोनाने घेतले १४९ बळी; २४ तासांत १७ जणांचा मृत्यू

धक्कादायक! भारतात कोरोनाने घेतले १४९ बळी; २४ तासांत १७ जणांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये नव्या ११४ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार २६४

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसने १४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार २७४ वर गेला आहे. तर २४ तासांत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८५ नव्या रुग्णांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तर ४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.

गाझियाबादसह १५ जिल्हे होणार सील

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने १५ जिल्ह्यांना सील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नोएडा, गाझियाबाद, मेरठ, लखनऊ, आगरा, शामली आणि सहारनपुर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वात अधिक कोरोनाग्रस्तांची संख्या आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात केवळ पोलीस, आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तर लखनऊ, आग्रा, गौतम बुध नगर, कानपूर, वाराणसी, बरेली, बुलंदशहर, फिरोजाबाद, महाराजगंज, सीतापूर आणि बस्ती हे जिल्हे हॉटस्पॉटवर असल्याने त्यांना येत्या १५ एप्रिलपर्यंत सील करण्यात आले आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. १४ एप्रिल रोजी या लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे. पण सद्यस्थिती पाहता लॉकडाऊनचा हा कालावधी वाढवण्यात यावा, अशी विनंती सर्वच राज्यांनी केंद्र सरकारला केली आहे. तसेच या वाढीव लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयही जूनपर्यंत बंद ठेवण्यात यावी, अशी मगाणी देशातील सर्व राज्यांनी केंद्राकडे केली आहे.


हेही वाचा – Corona Live Update: राज्यात ११७ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडले


First Published on: April 9, 2020 9:50 AM
Exit mobile version