Live Updates: देशात गेल्या २४ तासात २२,८८९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Live Updates: देशात गेल्या २४ तासात २२,८८९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
देशात गेल्या २४ तासात २२,८८९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील बाधितांचा आकडा वाढून ९९ लाख ७९ हजारांवर पोहोचला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले २३ दिवस दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. शेतकरी नेत्यांशी अनेकदा चर्चादेखील करण्यात आली. तरीही हे आंदोलन अद्याप थांबत नसल्याने अखेर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून संवाद साधणार आहेत.
आग्रा महामार्गावर चांदवड येथे खाजगी ट्रॅव्हल्स आणि गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक यांच्यात सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण ठार झालाय. युपी बिहार येथून मुंबईला १०० ते १२५ मजूर घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि मालेगाव येथे गॅस घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यानंतर खासगी बस पलटी होऊन महामार्गाच्या कडेला उभी असलेल्या काळी पिवळी गाडीवर पलटी झाली तर दोन टपऱ्यांचा चुराडा झाला. यावेळी महामार्गाने पायी फिरायला जाणाऱ्या एका स्थानिक नागरिकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय.
First Published on: December 18, 2020 8:54 AM
Exit mobile version