फायझर, सीरमनंतर स्वदेशी कंपनीचाही आपत्कालीन वापरासाठी DCGI कडे अर्ज

फायझर, सीरमनंतर स्वदेशी कंपनीचाही आपत्कालीन वापरासाठी DCGI कडे अर्ज

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या कोरोना लसीच्या आपात्कालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DGCI) अर्ज केला आहे. तर दुसरीकडे ‘फायझर’ची कोरोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. दरम्यान, यानंतर भारत बायोटेकच्या स्वदेशी ‘कोवॅक्सिन या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला आहे.

यापूर्वी अमेरिकेच्या फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनीने फायझरने फार्मास्युटिकल सेक्टरच्या नियामकाकडे अशीच परवानगी मागितली होती. परवानगी विचारणारी फायझर ही पहिली कंपनी आहे. यासाठी युके आणि बहरीनमध्ये फायझरला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वदेशी कोरोना लस तयार ‘कोवॅक्सिन’ विकसित करणारी कंपनी भारत बायोटेकने आपल्या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी डीजीसीआयकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती फायनॅन्शिअल एक्सप्रेसने दिली आहे. यासह ‘कोवॅक्सिन’ ही लस भारत बायोटेक आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे (ICMR) विकसित करण्यात येत आहे. यापूर्वी ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील काही महिन्यांमध्ये कोरोनावरील लस तयार होणार असल्याची शक्यता वर्तवली होती.

First Published on: December 8, 2020 9:11 AM
Exit mobile version