१२ वर्षाखालील लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस

१२ वर्षाखालील लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस

१२ वर्षाखालील लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस

जगभरात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. यात अनेक देशांनी आता कोरोना प्रतिबंधनात्मक अधिक प्रभाव लस तयार करण्यावर काम सुरु केले आहे. यात अमेरिकेच्या मॉर्डना या कंपनीने सहा महिन्यात १२ वर्षाखालील लहान मुलांवरही कोरोना लसीचे परिक्षण करण्याची तयार सुरु केली आहे. या लसीकरण परिक्षण मोहिमेत अमेरिकेसह कॅनडामधील ६ हजार ७५० मुलांना सहभागी करण्याची योजना आखली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यात १२ ते १७ वर्षापर्यंतच्या मुलांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. मात्र या लसीकरण परिक्षणनंतरच्या परिणामांसंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मॉर्डना ही कोरोना लसनिर्मित करणारी कंपनी लहान मुलांवर प्रयोग करत या लसीचा कितपत प्रभावी पडतो यांचा अभ्यास करणार आहे. या कंपनीने ‘एमआरएन’ ही वॅक्सीनची तयार केली आहे. तसेच सध्या लसीकरणाचा पहिल्या डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांच्या अंतराने दिला जातो. त्याचप्रमाणे या लसीकरण प्रयोगात सहभागी लहान मुलांनाही २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिले जाणार आहे.

या कंपनीने दोन टप्प्यात लसीकरण प्रयोगाचा अभ्यास करण्याची योजना आखली आहे. यातील पहिल्या टप्प्यात २ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरणाचे दोन डोस दिले जाणार आहेत. हा एक डोस ५० ते १०० माइक्रोग्रामचा असून २ वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना २५, ५० किंवा १०० माइक्रोग्रामचे प्रत्येकी दोन डोस दिले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्पात प्रभावी डोसची चाचणी करत तो मुलांना दिला जाणार आहे. यानंतर वैज्ञानिक दुसरा डोस देऊन झाल्यानंतरच्या एकुण लसीकरणाच्या प्रभावाचे १ वर्ष मॉनिटरिंग करणार आहेत. तर शेवटच्या टप्प्यात कोणत्या वयोगटासाठी कोणता डोस दिला पाहिजे याचे प्रमाण किती असावे याचे विश्लेषण केले जाणार आहे. अशी माहिती कंपनीने दिली आहे.

मॉर्डना कंपनी निर्मित ‘एमआरएन’ ही वॅक्सीन फ्रीजर तसेच नॉर्मल रेफ्रिजेरेटच्या तापमातही स्टोर केली जाऊ शकते. यामुळे लसीचे वितरण विकसनशील देशांपर्यंत करत टीकाकरणाच्या टप्प्यापर्यंत सुरक्षित राहून शकते. मॉर्डनाची कोरोना प्रतिबंधनात्मक ‘एमआरएन’ ही वॅक्सीन अमेरिकेच्या तीन मान्यताप्राप्त वॅक्सीनमधील एक आहे. यातील दोन वॅक्सीनमधील पहिली वॅक्सीन फाइजर-बायोएनटेकने विकसित केली आहे. तर जॉनसन अँण्ड जॉन्सनच्या वॅक्सीनला अमेरिकेने ग्रीन सिग्नल दिला आहे.


 

First Published on: March 17, 2021 11:17 AM
Exit mobile version