CoronaVirus: लाखो रुपयांचा किराणा माल चोरल्यामुळे महिलेला अटक!

CoronaVirus: लाखो रुपयांचा किराणा माल चोरल्यामुळे महिलेला अटक!

केंद्राकडून एका कोरोनाबाधित रुग्णामागे मिळतायत दीड लाख रुपये? जाणून घ्या सत्य

जगभरातील लोक कोरोना व्हायरससारख्या जागतिक महामारीचा सामना करत आहे. मात्र अजूनही या संकटात काही भ्रष्टबुद्धीचे लोक गुन्हा करताना दिसत आहेत. अशी एक घटना अमेरिकेत घटली आहे. कॅलिफोर्नियातील एका सुपरमार्केटमध्ये चोरी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेने चक्क १८०० डॉलर्स म्हणजे अंदाजे १.३७ लाख रुपयांचा किराणा माल आणि इतर वस्तू चोरल्याची माहिती एएफपीने पोलिसांना दिली आहे.

साउथ लेक तहोए पोलिस विभागाचे प्रवक्ते ख्रिस फिओरे यांनी सांगितलं की, मंगळवारी सेफवे स्टॉअरमध्ये ही घटना घटली. स्टोअरच्या मालकाने पोलिसांना बोलवून या घटनेची नोंद केली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचदरम्यान अशाप्रकारची घटना घडली आहे.

फिओरेने पुढे सांगितलं की, जेव्हा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सेफवेच्या एका कर्मचाऱ्यांने सांगितलं की, संशयित महिलेने स्टोअरमधील असंख्य ज्वेलरी तिने हातात ठेवल्या होत्या.

संशयित महिलेने ज्वेलरी घेतल्यानंतर तिने किराणा मालाचे सामान भरण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी संशयित महिलेची ओळख सांगितली असून या आरोपी महिलेचं नाव जेनिफर वॉकर असं आहे. तिच्याकडे ज्वेलरी, मद्य आणि मांस यासह वस्तूंनी भरलेले ट्रॉली होती. परंतु या सर्व गोष्टी विकत घेण्यासाठी तिच्याकडे काहीच पैसे नव्हते. आरोपी जेनिफर वॉकरचं वय ५३ असून तिने तोडफोड केल्याबद्दल अटक केली आहे. तसंच तिने घेतलेल्या वस्तूचे नुकसान झाल्यामुळे ते पुन्हा विकण्यासाठी ठेवले नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

जगभरात अमेरिकेत कोरोना व्हारसचा प्रादुर्भाव इतर देशाच्या तुलनेत खूप जास्त आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ५४ हजार ६०२वर पोहोचली आहे. तसंच यापैकी १६ हजार ७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – धक्कादायक! टिकटॉक व्हिडीओवरील कोरोनाचा घरगुती उपाय पडला महाग!


 

First Published on: April 9, 2020 11:19 PM
Exit mobile version