Covid-19 R Value: देशात पुन्हा कोरोनाच्या R Value मध्ये वाढ; केरळमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद

Covid-19 R Value: देशात पुन्हा कोरोनाच्या R Value मध्ये वाढ; केरळमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद

वैज्ञानिकांच्या मते कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तिसरी लाट जाहीर करण्यात घाई करु नये

देशातील कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार दर्शविणारा ‘आर-फॅक्टर’ वाढताना दिसत आहे. केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ‘आर-फॅक्टर’ कोरोना महामारीच्या संसर्गाची पुन्हा चिंता वाढवत आहे. चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या संशोधकांनी केलेल्या विश्लेषणातून असे समोर आले की, देशातील दोन मोठी शहरं म्हणजे पुणे आणि दिल्ली ‘आर-फॅक्टर’च्या जवळ असल्याचे समोर आले आहे. देशात कोरोना संसर्गाची गती पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा बर्‍याच राज्यात वाढता दिसत असल्याने कोरोनाचा प्रसार आणि वाढती रूग्ण दर्शवणाऱ्या आर फॅक्टरमध्येही हळूहळू वाढ होत आहे. केरळ आणि ईशान्येकडील राज्ये ‘आर-फॅक्टर’च्या अव्वल स्थानी असल्याने पुन्हा एकदा महामारीच्या प्रादुर्भावाबद्दल चिंता व्यक्त केली जात असून केरळमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

चेन्नईच्या गणितीय विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या विश्लेषणातून असे समोर आले की, जेव्हा देशात कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती, त्यावेळी देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, तेव्हा आर फॅक्टर 1.37 अपेक्षित होते. त्याचबरोबर एप्रिल ते 1 मे दरम्यान आर फॅक्टर घटून 1.18 टक्के झाला होता. त्याचप्रमाणे, पुढील काही महिन्यात आर फॅक्टरमध्ये घट झाली, परंतु 20 जून ते 7 जुलै दरम्यान आर फॅक्टर पुन्हा 0.88 टक्के वाढले आणि 3 जुलै ते 22 जुलै दरम्यान ते 0.95 टक्के झाले आहे. म्हणजे कोरोना रूग्णांमध्येही वाढ होताना दिसतेय.

जाणून घ्या कोरोनाचा R फॅक्टर म्हणजे काय

देशात नोंदल्या गेलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरुन R व्हॅल्यू काढली जाते. यात लक्ष देण्याची बाब म्हणजे जितका डेटा अॅक्युरेट असेल, तितकी R व्हॅल्यू योग्य असते. आर फॅक्टर 1.0 पेक्षा जास्त असणे हे कोविड -19 च्या वाढत्या केसेसचे लक्षण आहे. म्हणूनच, अधिका-यांनी सतर्क राहून गर्दीच्या ठिकाणी मास्क, सामाजिक अंतर आणि इतर कोविड -19 प्रतिबंधक उपायांचे काटेकोरपणे पालन होते की नाही याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. वैज्ञानिकांच्या मते, R फॅक्टर म्हणजे पुनरुत्पादन दर आहे. यावरुन संक्रमित व्यक्तींमुळे किती लोक संक्रमित होत आहेत किंवा होऊ शकतात, हे समजते. जर R फॅक्टर 1.0 पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ असा की प्रकरणे वेगाने वाढत आहेत. दुसरीकडे, R फॅक्टर 1.0 पेक्षा कमी असणे किंवा त्यात घसरण होत जाणे हे कमी होणा-या प्रकरणांचा संकेत आहे. हे 100 लोकांना संसर्ग झाल्यास देखील समजले जाऊ शकते. जर 100 लोक संक्रमित असेल तर R व्हॅल्यू 1 होईल. परंतु जर ते 80 लोकांना संक्रमित करत असतील तर R व्हॅल्यू 0.80 असेल.


 

First Published on: July 30, 2021 3:56 PM
Exit mobile version