Live Update: भारतातून कोविशिल्ड लस म्यानमार, मॉरिशसला रवाना

Live Update: भारतातून कोविशिल्ड लस म्यानमार, मॉरिशसला रवाना
आज भारताकडून म्यानमार, सेशेल्स, मॉरिशसला लसीचा साठा रवाना झाला आहे. त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचा साठा मुंबई विमानतळावर दाखल झाला आहे. नेबर फर्स्ट धोरणांतर्गत भारत शेजारील देशांना मदत करत आहेत.
देशात गेल्या २४ तासांत १४ हजार ५४५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १६३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात १८ हजार २ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ६ लाख २५ हजार ४२८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५३ हजार ३२ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी २ लाख ८३ हजार ७०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १ लाख ८८ हजार ६८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सिरम इन्सिस्टूटच्या नव्या इमारतीला लागली आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार रात्री साडे नऊ किंवा दहाच्या दरम्यान ही भीषण आग पूर्णपणे विझवण्यात आली. पण खबरदारी म्हणून ३ बंब इमारती जवळ ठेवण्यात आलेले होते. या भीषण आगीत ५ जणांचा मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबियांना सिरम इन्स्टिट्यूटकडून २५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. तसेच सरकारकडून देखील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जगात ज्याप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्याप्रमाणे बरे होण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटर आकडेवारीनुसार जगातील कोरोनाबाधितांची संख्या ९ कोटी ८० लाख ५० हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी आतापर्यंत २० लाख ९८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ७ कोटी ४ लाख ४६ हजारांहून अधिकजण कोरोनामुक्त झाले आहेत.  
First Published on: January 22, 2021 10:44 AM
Exit mobile version