Live Update: सिंघू बॉर्डरवर पुन्हा मोठा पोलीस बंदोबस्त

Live Update: सिंघू बॉर्डरवर पुन्हा मोठा पोलीस बंदोबस्त

सिंघू बॉर्डरवर पुन्हा मोठा पोलीस बंदोबस्त. स्थानिक व्यापाऱ्यांचं सिंघू बॉर्डरवर आंदोलन


दिल्लीत शेतकरी आंदोलनात जखमी झालेल्या पोलिसांना गृहमंत्री अमित शाह भेटणार असल्याचे समोर आले आहे.


देशात गेल्या २४ तासांत ११ हजार ६६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात १४ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ७ लाख १ हजार १९३ झाला आहे. यापैकी १ लाख ५३ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ३ लाख ७३ हजार ६०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १ लाख ७३ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


जगात कोरोना व्हायरसचा कहर काही थांबताना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १० कोटी १४ लाख ३३ हजार पार गेला आहे. यापैकी आतापर्यंत २१ लाख ८४ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ कोटी ३३ लाख २० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

First Published on: January 28, 2021 2:12 PM
Exit mobile version