भारतीय व्हिसासाठी क्रिमीनल रेकॉर्ड दाखवणे बंधनकारक

भारतीय व्हिसासाठी क्रिमीनल रेकॉर्ड दाखवणे बंधनकारक

प्रातिनिधिक फोटो

परदेशी किंवा एनआरआय नागरिकांना भारताचा व्हिसा मिळवायचा असेल तर त्यांना क्रिमिनल रेकॉर्ड दाखवणे गरजेचे असणार आहे. जर कोणत्याही नागरिकावर गुन्ह्यांचे खटले शुल्लक असतील तर त्यांना भारताचा व्हिसा दिला जाणार नाही. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री मेनका गांधी यांनी याबद्दल नुकतेच ट्विट केलं आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या इमिग्रेशन ब्यूरो याची तपासणी करणार आहे. व्हिसा मिळवताना लोकाना त्यांच्या जवळ पोलिसांचे नाहरकतपत्र किंवा जर त्यावर कोणत्या गुन्ह्याचा खटला सुरु असेल तर याची माहिती द्यावी.

मेनका गांधींनी केलं ट्विट

या संदर्भात केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री मेनका गांधी यांनी ट्विट केलं आहे की, “मला महिती देण्यास आनंद होतो की, परदेशी नागरिकांना भारताचा व्हिसा अर्ज करताना क्रिमिनल रेकॉर्ड जाहीर करणे आवश्यक असणार आहे. बाल लैंगिक अत्याचारामुळे हा निर्णय घेण्यात आला. व्हिसा अर्ज करणाऱ्यांना आपल्यावर असलेल्या गुन्हांचे अहवाल सादर कराणे आवश्यक आहे”

परदेशी रुग्णांसाठी व्हिसा अटी शिथिल

परदेशातून भारतात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी व्हिसा प्रक्रियेतील अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. किरकोळ आजारावर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मेडिकल व्हिसाची गरज नाही. अचानक झालेल्या आजारात १८० हून अधिक काळ रुग्णालयात भर्ती करण्याची आवश्यकता असल्यास त्यांना स्थानिक रुग्णालयातून वैद्यकिय प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे आहे.

First Published on: October 23, 2018 1:39 PM
Exit mobile version