Corona: कोरोना लसीवरील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची चाचणी पुढच्या टप्प्यात

Corona: कोरोना लसीवरील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची चाचणी पुढच्या टप्प्यात

कोरोना महामारीवर नियंत्रण यावे यासाठी जगभरात लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञ संशोधन करत आहे. जागितक आरोग्य संघटनेतर्फेही ४०० शास्त्रज्ञ मिळून लस बनवण्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यातच आता एक आशावादी चित्र समोर येत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी शुक्रवारी कोरोना विषाणूवर बनवण्यात येणाऱ्या लसीचा पहिला टप्पा यशस्वी झाला असल्याचे म्हटले आहे. आता हे संशोधन मानवावर चाचणी करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात केले जाणार आहे. या चाचणीसाठी १० हजाराहून अधिक लोकांचा समावेश ते करत आहेत.

हेही वाचा – वारली आदिवासींच्या उठावाला ७५ वर्षे पुर्ण

वयोवृद्ध आणि लहान मुलांवर चाचणी 

लस बनवण्याचे परिक्षणाचा पहिला टप्पा गेल्या महिन्यात सुरू करण्यात आला होता. ज्यामध्ये ५५ वर्षाखालील जवळपास एक हजार निरोगी लोकांवर त्यांची चाचणी करण्यात आली. आता त्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक ओळखण्यासाठी ७० वर्षाहून जास्त आणि ५ ते १२ वयोगटातील मुलांसह १० हजार २०० हून अधिक लोकांवर त्याचे प्रयोग होणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच एका अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, ChAdOx1 आणि कोविड – १९ या लसीने माकडांवर केलेल्या चाचणी प्रयोगात सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले आहेत. युनिव्हर्सिटीच्या जेनर इंस्टिट्युटमध्ये व्हॅक्सिनोलॉजीचे प्राध्यापक सारा गिलबर्ट यांनी याबाबत माहिती दिली की, कोविड – १९ लसीची ट्रायल टीम ChAdOx1 nCoV-19 ची सुरक्षा आणि इम्युनोजेनेसिटी तसेच लस प्रभावी बनवण्यासाठी कठिण परिश्रम घेत आहेत. देशातील काही इतर भागांमध्येही या संशोधनाचे प्रयोग केले जातील.

First Published on: May 23, 2020 10:30 AM
Exit mobile version