शहीदांचे खोटे फोटो शेअर करु नका – सीआरपीएफ

शहीदांचे खोटे फोटो शेअर करु नका – सीआरपीएफ

शहीद जवानांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करु नका, असे आवाहन सीआरपीएफने केलं आहे.

पुलवामा येथे घडलेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या सोशल मीडियावर शहीद जवानांचे खोटे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हे फोटो शेअर न करण्याचे आवाहन सीआरपीएफने केलं आहे. परंतु, या चुकीच्या फोटोंमुळे शहीदांचा अपमान होत आहे. त्यामुळे असे फोटो शेअर न करण्याचे आवाहन सीआरपीएफने जनतेला केलं आहे.

सोशल मीडियावर फिरणारे फोटो बनावट

‘पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर शहीद जवानांचे कसेही फोटीही व्हायरल होत आहे. यातले काही फोटो बनावटी आहेत. काही समाजकंटक अशा स्वरुपाचे फोटो व्हायरल होत आहे. त्यांना आपण रोखलं पाहीजे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र व्हायला हवं. अशा स्वरुपाचे फोटो शेअर करु नका. त्याचबरोबर या फोटोंना लाईकही करु नका’, असे आवाहन सीआरपीएफने केलं आहे.

First Published on: February 17, 2019 4:05 PM
Exit mobile version