CSK vs SRH 2024 : धोनीमुळे चेन्नईच्या चाहत्याने प्रेयसीशी केला ब्रेकअप, पोस्टर व्हायरल

CSK vs SRH 2024 : धोनीमुळे चेन्नईच्या चाहत्याने प्रेयसीशी केला ब्रेकअप, पोस्टर व्हायरल

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात झाला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 78 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या विजयासह चेन्नई आयपीएल 2024च्या गुणतालिकेत टॉप-3 मध्ये पोहोचली आहे. पण या सामन्यात धोनीच्या जर्सीवरील 7 क्रमांकामुळे एका चाहत्याने आपल्या प्रेयसीशी ब्रेकअप केल्याचे पाहायला मिळाले. संबंधीत चाहत्याने सामन्यादरम्यान एक पोस्टर झळकवले होते. त्या पोस्टरवर त्याने प्रेयसीसोबत ब्रेकअप केल्याचे लिहिले होते. (csk vs srh 2024 break up with girlfriend because of ms dhoni poster went viral)

चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चेन्नईच्या चाहत्याने पोस्टरवर लिहिले होते की, ‘मी माझ्या प्रेयसीशी संबंध तोडले, कारण तिच्या नावावर 7 अक्षरे नाहीत’. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या जर्सीचा क्रमांक सात आहे. शिवाय त्याचा वाढदिवस 7 जुलैला आहे.

हेही वाचा – IPL 2024: हैदराबादला हरवून चेन्नईची पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप; ऑरेंज कॅपच्याजवळ गायकवाड

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकात 3 बाद 212 धावा केल्या. चेन्नईने दिलेल्या या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादच्या संघाला केवळ 18.5 षटकात 134 धावा करता आल्या. या सामन्यात 134 धावांवर हैदराबादचा संघ सर्वबाद झाला. आयपीएलच्या या पर्वात हैदराबादच्या फलंदाजांनी तुफानी फलंदाजी केली आहे. हैदराबादच्या फलंदाजांची ही खेळी पाहता चेन्नईसाठी हा सामना जिंकणे सोपे जाणार नाही, असे वाटत होते, परंतु चेन्नईने 78 धावांनी विजय नोंदवत स्पर्धेत शानदार पुनरागमन केले.

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी धोनी देवापेक्षा कमी नाही. चेन्नईचे चाहते धोनीला थला म्हणजेच नेता म्हणतात. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचवेळी आयपीएलचे विजेतेपदे जिंकले आहे. यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये धोनी कर्णधार नसून, यंदा कर्णधार पदाची धुरा रुतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.


हेही वाचा – T20 World Cup 2024 : नऊ खेळाडूंची नावं शर्यतीत; भारतीय संघ या तारखेला अमेरिकेला होणार रवाना

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 29, 2024 7:00 PM
Exit mobile version