गुजरातमध्ये दलित दाम्पत्याला मारहाण

गुजरातमध्ये दलित दाम्पत्याला मारहाण

घृणास्पद मारहाण

गुजरातच्या राजकोट शहरात एका दलित दाम्पत्याला घृणास्पद मारहाण करण्यात आली. यात पतीचा मृत्यू झाला असून, पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पीडित पती-पत्नीच्या कुटुंबियांनी पोस्टमार्टम हाउसच्या बाहेर न्यायासाठी धरणे आंदोलन केले. पीडित पती-पत्नी कचरा गोळा करण्यासाठी राजकोट रादादिया विभागात गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर चोरीचा आरोप तेथील एका कारखान्याच्या मालकाने केला. आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही लोकांनी एकत्र येत लोखंडी रॉड आणि काठीने त्यांना मारहाण केली.

पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
आपल्या पतीला घृणास्पद मारले जात आहे, हे बघत पत्नीने तेथून पळ काढला आणि ती ओळखीच्या लोकांना घटनास्थळी घेऊन आली. त्यानंतर पीडित मुकेशला राजकोटच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. परंतु, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

या अगोदरही गुजरातमध्ये दलिंतावर झाला होता अत्याचार
काही दिवसांपूर्वीही दलितांवर मारहाण केल्याच्या बऱ्याच घटना गुजरातमध्ये घडल्या आहेत. त्यात गाईचे मांस खाण्यावरुन झालेला वाद गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनला होता.

First Published on: May 21, 2018 9:55 AM
Exit mobile version