Coronavirus: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण

Coronavirus: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण झाल्याचे सीएनएनच्या न्यूज १८च्या वृत्तानुसार समोर आलं आहे. दाऊदची पत्नी महजबीन हिला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचं पाकिस्तानमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात येते आहे. त्यामुळे दाऊद आणि पत्नी महजबीन हिला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्याच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

मागील वर्षी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने ब्रिटनमधील एका न्यायालयाला दाऊत इब्राहिम सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती दिली होती. पण आता सीएनएनच्या वृत्तानुसार दाऊदला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा खोटारडेपण उघडकीस आलं आहे.

या वृत्तानुसार दाऊद लष्कर ए तोयबाच्या काही लोकांना दहा दिवसांपूर्वीच भेटला होता. तसेच तो काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमधून कराचीमध्ये आला. त्यामुळे आता दाऊदला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्तींशी तो संपर्कात आला होता त्यांची तपासणी करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता मागील २५ वर्षांपासून अधिक काळ दाऊदला पाकिस्तानेच आसारा दिल्याचे उघड होईल असं सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – पाकिस्तानमध्ये कोरोना हॉटस्पॉटच्या भागात दोनच व्हेंटिलेटर


 

First Published on: June 5, 2020 4:29 PM
Exit mobile version