गोव्यात प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या खोलीत सापडले ड्रग्ज; विकास नागलला अटक

गोव्यात प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या खोलीत सापडले ड्रग्ज; विकास नागलला अटक

गोव्यात प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या भाड्याच्या खोलीत ड्रग्ज सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी विकास नागल याला अटक करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातल्या काही भागांमध्ये आयपॅकचे सदस्य मतदारांना पैसे वाढत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि यादरम्यान मूळचा हरयाणाचा असलेला विकास नागल यांच्या भाडाच्या खोलीत ड्रग्ज सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे याप्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

आयपॅक आणि तृणमूल काँग्रेस लोकांना पैसे देऊन डेटा गोळा करत असल्याचे तक्रार काही राजकीय पक्षांनी केली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी आयपॅक कर्मचाऱ्याच्या घराची झडती घेतली आणि यादरम्यान ड्रग्ज आढळले. याप्रकरणी आयपॅकचा कर्मचारी विकास नागलला अटक करण्यात आली आहे. आयपॅक गोव्यामध्ये तृणमूल काँग्रेससाठी काम करत असून टीएमसीसाठी निवडणुकीचा प्रचार करत आहे. जे लोकं आयपॅकसाठी काम करत आहेत, त्यांची दक्षिण आणि उत्तर गोवामध्ये ठिकाणे होती. जेव्हा आयपॅक कर्मचाऱ्याच्या घरात ड्रग्ज आढळले तेव्हापासून आयपॅकसंबंधित असलेल्या ठिकामी पोलिसांनी रात्रभर छापेमारी केली. अद्याप या छापेमारीत काय काय निष्पन्न झाले? काय काय मिळाले? ते स्पष्ट झाले नाही.

मात्र आयपॅक कर्मचाऱ्याच्या घरात ड्रग्ज सापडल्यामुळे आता याप्रकरणाचा सखोल तपास गोवा पोलीस करत आहे. त्यामुळे याप्रकरणी आणखीन काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान १०८ महापालिकांच्या उमेदवारीवरून तृणमूलमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांच्या मतभेद झाले असून आज तृणमूलने तातडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे.


हेही वाचा – Goa Assembly 2022 : आमच डिपॉझिट जप्त होतय, मग का टीका का करताय ? होऊद्या प्रचार, आदित्य ठाकरेंचे


 

First Published on: February 12, 2022 3:14 PM
Exit mobile version